Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'भगवान श्रीकृष्णाची कृपा असेल तर...', कंगना रनौतने दिले लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

Lok Sabha Election 2023: कंगना रनौतचा 'तेजस' चित्रपट (Tejas Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जादू करणं काही जमलं नाही.

Priya More

Kangana Ranaut Lok Sabha Election:

बॉलिवूडची (Bollywood) कॉन्ट्रव्हर्सी क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना रनौत आपल्या सोशल मीडिया (Social Media) पोस्ट आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. सामाजिक असो वा राजकीय कोणत्याही विषयावर ती ठामपणे मत मांडत असते.

नुकताच कंगना रनौतचा 'तेजस' चित्रपट (Tejas Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जादू करणं काही जमलं नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. अशामध्ये आता कंगना रनौत पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे कंगनाने लोकसभा निवडणूक लढवण्याची हिंट दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंगना रनौतने गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिने देवाच्या चरणी माथा टेकवून पूजा केली. कंगनाला मंदिरामध्ये पाहून त्याठिकाणी आलेले भाविक आश्चर्यचकीत झाले. कंगना रनौतने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना 'भगवान श्रीकृष्णाची कृपा अशेल तर मी लोकसभा निवडणूक लढवेल.' असं सांगितले. कंगनाने लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत दिलेल्या संकेतामुळे आता ती चर्चेत आली आहे.

कंगनाने सांगितले की ‘द्वारका नगरी खूपच दिव्य आहे. येथील प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. माझ्या हृदयात द्वारकाधीश आहेत. द्वारकाधीशांचं दर्शन झाल्यानंतर मला खूपच प्रसन्न वाटलं. द्वारकाधीशच्या दर्शनासाठी नेहमी येण्याचा मी प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाही. सरकारने अशी सुविधा द्यावी की ज्यामुळे पाण्याखाली असलेली द्वारका पाण्यात जावून पाहाता येवू शकेल. भगवान श्रीकृष्णाची नगरी आपल्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.'

कंगना रनौतने द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्यानंतर आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. कंगनाने यावेळी गोल्डन कलरची सुंदर साडी नेसली होती. अनेक दिवस मी बैचेन होती पण आता देवाचे दर्शन घेतल्यानंतर माझ्या मनाला खूप शांती मिळाली असल्याचे कंगनाने यावेळी सांगितले.

कंगनाने इन्स्टावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले की,'माझे मन काही दिवसांपासून खूपच अस्वस्थ होते. मला द्वारकाधीशाच्या दर्शनाला यायचे होते. श्रीकृष्णाच्या या दिव्य नगरीत द्वारकेत येताच मसा असे वाटले की माझे सर्व टेंशन दूर झाले. माझे मन शांत झाले असून मला खूप आनंद झाला आहे. द्वारकाधीश अशाच पद्धतीने माझ्यावर कृपा ठेव. हरे कृष्णा.' कंगना रनौतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT