Kangana Ranaut On BJP Saam Tv
मनोरंजन बातम्या

विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास मी उत्सुक, Kangana Ranaut ने भाजपकडून तिकीट मिळताच मानले आभार

Priya More

Kangana Ranaut Post:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार आहे. कंगना रनौतला भाजपकडून (BJP) तिकीट देण्यात आले आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तिकीट मिळाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत कंगना रनौतने भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. कंगना रनौतचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

कंगनाने ट्वीटमध्ये असे लिहिले की, 'माझ्या प्रिय भारताचा आणि भारतीय जनतेचा आपला पक्ष भारतीय जनता पार्टीला नेहमीच माझा बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला मंडी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. कंगना रनौतने पुढे लिहिले की, 'मी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत हायकमांडच्या निर्णयाचे पालन करते. अधिकृतपणे पक्षात सहभागी होण्यासाठी मी सन्मानित आणि उत्साहित आहे. मी एक सक्षम 'कार्यकर्ता' आणि एक विश्वासार्ह लोकसेवक बनण्यास खूप उत्सुक आहे.'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजपने रविवारी १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतलाही तिकीट दिले आहे. ती हिमाचलमधील मंडी येथून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय भाजपने दुमका येथून हमेत सोरेन यांची मेहुणी सीता सोरेन यांना तिकीट दिले. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

यासोबतच भाजपने पश्चिम बंगालच्या तमलूक मतदारसंघातून न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनाही उमेदवारी दिली आहे. गंगोपाध्याय यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या काही तास आधी कुरुक्षेत्राचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना कुरुक्षेत्रातूनच उमेदवारी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT