Gauahar Khan On Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gauahar Khan On Rakhi Sawant: ‘अबाया घातल्याने कोणी मुस्लिम होत नाही’, राखी सावंतचा लूक पाहून गौहर खानचा पारा चढला

Gauahar Khan And Rakhi Sawant News: राखी मायदेशी परतातच तिच्या लूकची सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

Chetan Bodke

Gauahar Khan On Rakhi Sawant

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नुकतीच उमराह करून ती मायदेशी परतली आहे. अभिनेत्री मायदेशी परतातच तिच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा देखील झाली आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून सोशल मीडियावर तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलंय. उमराह करून मक्क्यावरून परतल्यानंतर राखीचा लूक फारच चेंज झाला आहे. सध्या राखीला त्या लूकवरून एका बॉलिवूड अभिनेत्रीने ट्रोल केलं आहे. दरम्यान, राखीने हा ड्रामा बंद करावा, असं म्हणत तिच्यावर नाव नं घेता निशाणा साधलाय.

कायमच तोडक्या मोडक्या कपड्यात दिसणारी राखी, एका वेगळ्याच लूकमध्ये चर्चेत आली आहे. दरम्यान, राखी लाल रंगाच्या बुरख्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. राखीला या लूकवरून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे तर, अनेकांनी तिला ट्रोल केलंय. नुकतंच अभिनेत्री गौहर खानने राखीवर नाव न घेता तिच्यावर निशाणा साधलाय. ‘राखीने हा ड्रामा बंद करावा...’, असं म्हणत तिच्यावर नाव नं घेता निशाणा साधलाय. नुकतंच गोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने धार्मिक गोष्टींचा पब्लिसिटी स्टंट म्हणून वापर केला जातो, असा आरोप देखील केला आहे.

नुकतंच गौहरने एक पोस्ट शेअर केली, या पोस्टमध्ये अभिनेत्रीने कतारमधील एका धर्मादाय संस्थेने २० अनाथ मुलांना उमराहसाठी मक्केला कसे काय पाठवले? असा प्रश्न उपस्थित करत स्टोरी शेअर केली. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “अनेक लोकं इस्लाम धर्माला हलक्यात घेत आहेत. धर्माचा आदर करणाऱ्या आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या पवित्र तिर्थयात्रेचे काही लोकं खिल्ली उडवत आहेत. आधी धर्म स्विकारायचा आणि नंतर मी हे स्वत:केलेलं नाही असं म्हणायचं. काय हा मुर्खपणा. भारत आणि सौदीतील इस्लाम बोर्डाने अशी पब्लिसिटी स्टंट करणाऱ्यांवर कारवाई करावी. त्यामुळे अशा पवित्र गोष्टीचा लोकं गैरफायदा घेणार नाहीत. ”

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “अबाया किंवा बुरखा परिधान केल्यामुळे कोणीही मुस्लिम होत नाही. चांगला माणूस आणि अल्लाहवर प्रेम करणे तुम्हाला मुस्लिम बनवते. तुमचा कोणत्याही गोष्टीवर विश्वास सिद्ध करण्यासाठी ५९ कॅमेऱ्यांची गरज नाही.” गौहरने नाव न घेता राखीवर निशाणा साधत तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT