Anushka Sharma And Virat Kohli Diwali Celebration Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma: अनुष्का शर्माने टीम इंडियासोबत बंगळुरूमध्ये केलं खास दिवाळी सेलिब्रेशन, VIDEO आला समोर

Anushka Sharma And Virat Kohli: हे कपल पारंपारिक आणि स्टायलिश लूकमध्ये दिसले. या दोघांच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Priya More

Anushka Sharma And Virat Kohli Diwali Celebration:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) बंगळुरूमध्ये पती विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम इंडियासोबत दिवाळी सेलिब्रेशन केले. सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

विराट आणि अनुष्काने बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये टीम इंडियासोबत दिवाळी सेलिब्रेश केले. यावेळी हे कपल पारंपारिक आणि स्टायलिश लूकमध्ये दिसले. या दोघांच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

नेदरलँड्सविरुद्ध टीम इंडियाच्या मॅचपूर्वी बंगळुरूमध्ये दिवाळी सेलिब्रेश करण्यात आले. अनुष्का यावेळी पती विराट कोहलीसोबत खूपच हॅपी दिसत होती. या दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यामध्ये विराट आणि अनुष्का एकत्र चालताना आणि बोलताना दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या सूट आणि जांभळ्या रंगाच्या ओढणीमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती. तर विराटने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अनुष्का आणि विराट वामिकानंतर दुसऱ्या मुलाचे प्लानिक करत असल्याची चर्चा होत आहे. अशामध्ये सोशल मीडियावर आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्माचा बेबीबंप स्पष्टपणे दिसत आहे. याच आधारावर नेटिझन्स आणि दोघांचे फॅन्स विराट आणि अनुष्का आई-बाबा होणार असल्याचे म्हणत आहेत. पण या कपलने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही.

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले. हे कपल सध्या सर्वांचे आवडते कपल आहे. ११ जानेवारी २०२१ मध्ये विराट आणि अनुष्का आई-बाबा झाले. त्यांच्या मुलीचे नाव वामिका आहे.

दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विराट आणि टीम इंडियाचे इतर खेळाडू रविवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर वर्ल्ड कपची फायनल मॅच खेळणार आहेत. तर अनुष्का शर्मा माजी भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक असलेल्या 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट फक्त Netflix वर रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अदयाप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT