Aditi Rao Hydari Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditi Rao Hydari: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचं खरंच लग्न झालं का?, अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत सांगितलं सत्य

Aditi Rao Hydari And Siddhrth Wedding: आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या वृत्तानंतर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांमागचे सत्य सांगितले आहे. आदिती आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

Priya More

Aditi Rao Hydari And Siddhrth Engagement:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) लग्न केलं असल्याच्या बातम्या बुधवारी समोर आल्या. आदितीने आपला लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थसोबत (Siddharth) गुपचूप लग्न केलं असल्याचे म्हटले जात होते. पण आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाचे वृत्त खोटं निघाले आहे. आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या वृत्तानंतर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांमागचे सत्य सांगितले आहे.

आदिती राव हैदरीने बुधवारी सिद्धार्थसोबत तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातल्या श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या कपलने आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न केले असल्याचे बोलले जात होते. पण या कपलच्या लग्नाचा एकही फोटो अजूनपर्यंत समोर आला नव्हता. आता आदितीने या लग्नामागचे सत्य सांगितले आहे. आदितीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आदितीने आमचे लग्न झालेले नसून फक्त साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे.

आदिती आणि सिद्धार्थने या फोटोच्या माध्यमातून आपल्या साखरपुड्याची रिंग फ्लॉन्ट केली आहे. सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत आदितीने कॅप्शनमध्ये 'तो हो म्हणाला' असे लिहिले आहे. त्याचसोबत तिने कॅप्शनमध्ये Engaged असे लिहित रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. आदितीच्या यो पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. या पोस्टला अवघ्या एका तासांमध्ये साडेचार लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर तिच्या आणि सिद्धार्थच्या चाहत्यांनी कमेंट्स करत दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अदिती राव ही हैदरी राजघराण्यातील एक राजकुमारी आहे. तिचे पहिले लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. पण त्यांचा संसार अवघ्या 4 वर्षांत मोडला. 2013 मध्ये वेगळे झाल्यानंतर आदितीचे नाव साऊथ अभिनेता सिद्धार्थसोबत जोडले गेले. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर रील शेअर करण्यापासून ते इव्हेंटमध्ये एकत्र येण्यापर्यंत दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

आदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृत घोषणा केली नाही. पण आता सोशल मीडियावर साखपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी नात्यांनी कबुली दिली. 2021 मध्ये 'महा समुद्रम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. सिद्धार्थ लवकरच कमल हासन यांच्या 'इंडियन २' चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर आदिती राव हैदरी लवकरच संजय लीला भन्साली यांच्या 'हिरामंडी' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: मराठीसह इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला- पीएम मोदी

Lenovo Tab: नवीन लेनोवो टॅब भारतात लाँच! दमदार फीचर्ससह १०,९९९ रुपयांपासून उपलब्ध

PM Narendra Modi : यापुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, सिंधू पाणी करारावरून पीएम मोदींनी पाकिस्तानला खडसावले

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT