12th Fail Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

12th Fail Trailer: IPS अधिकारी होण्याच्या जिद्दीने पछाडलेल्या तरुणांच्या संघर्षाची कहाणी, '12th Fail' चा दमदार ट्रेलर रिलीज

Vikrant Massey Movie: हा चित्रपट त्या सर्व लोकांना ट्रिब्यूट करतो जे अपयश आल्यानंतरही हार न मानता पुढे जाण्यासाठी धैर्य आणि चिकाटी दाखवतात.

Priya More

12th Fail Movie:

'तारे जमीन पर', '३ इडियट्स' आणि 'छिछोरे' यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर आधारीत चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिल्यानंतर आता दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा लवकरच नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या '12वी फेल' (12th Fail) या नव्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट रिअल लाइफवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे.

'12वी फेल' या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट जगातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा समजल्या जाणाऱ्या यूपीएससीसाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या सत्यकथांवरून प्रेरित आहे. या चित्रपटाची कहाणी दिल्लीच्या मुखर्जी नगरपासून सुरू होते. जिथे हजारो मुलं आयएएस आणि पीसीएसची तयारी करताना दिसतात. हा चित्रपट त्या सर्व लोकांना ट्रिब्यूट करतो जे अपयश आल्यानंतरही हार न मानता पुढे जाण्यासाठी धैर्य आणि चिकाटी दाखवतात.

अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या '12वी फेल' या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. जी कांदबरी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या अद्भुत प्रवासाला अनुसरून आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांचा संयम, मेहनत, कधीही न संपणारी मैत्री याची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे खरं आयुष्य कसं असतं याचा प्रत्यय येतोय.

'12वी फेल'चे दिग्दर्शन '3 इडियट्स'चे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. 12वी फेल हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 12वी फेल चित्रपट फक्त हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT