Sam Bahadur New Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur New Poster: 'जिंदगी उनकी है, इतिहास हमारा', 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचे नवीन पोस्टर रिलीज

Vicky Kaushal New Poster Released: या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील पहिल्या फिल्ड मार्शलच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे.

Priya More

Vicky Kaushal News Look From Sam Bahadur:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. विकीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण आता तो लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विकी त्याच्या 'सॅम बहादूर' (Sam Bahadur) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे विकीचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील पहिल्या फिल्ड मार्शलच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे.

विकी कौशलचे चाहते त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी 'साम बहादूर'मधून विकीचा नवा लूक रिलीज केला आहे. ज्यामध्ये विकी एका दमदार अवतारात दिसत आहे. विकीने या चित्रपटातील त्याच्या नव्या लूकचे पोस्टर आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये 'जिंदगी उनकी है, इतिहास हमारा' असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. हे पोस्टर शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये 'चांगल्या आयुष्यासाठी.', असं लिहिलं आहे. विकीच्या या पोस्टला अवघ्या काही तासांमध्येच साडेतीन लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

चित्रपटाच्या टीझरबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाचा टीझर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान लॉन्च ग्राउंडवर रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट भारताच्या पहिल्या फील्ड मार्शल सॅम मानेकशॉची कथा आहे. ज्यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयासाठी जबाबदार होते. जगाचा नकाशा बनवण्यात सॅम बहादूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सॅम बहादूर'चा टीझर १३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या टीझरसाठी विशेष नियोजन करून निर्मात्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक २०२३ सामन्याचा दिवस निवडला आहे. कारण शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून क्रिकेट स्टेडियममध्ये सॅम बहादूरचा टीझर स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT