Dono Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dono Trailer Out: सनी देओलचा मुलगा राजवीरचा रोमँटिक अंदाज, 'दोनो' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आऊट

Rajveer - Paloma Romantic Movie: सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलनंतर आता धाकटा मुलगा राजवीर (Rajveer Deol) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करत आहे.

Priya More

Bollywood Dono Movie:

'गदर २' च्या (Gadar 2) दमदार यशामुळे बॉलिवूड अभिनेता सनी देओल चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अशामध्ये आता सनी देओलचा आणखी एक मुलगा बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करत आहे. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलनंतर आता धाकटा मुलगा राजवीर (Rajveer Deol) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करत आहे. सूरज बडजात्याच्या प्रोडक्शन हाऊसने तयार केलेल्या 'दोनो' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

'दोनो' चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर मागच्या महिन्यातच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाच्या टीझरमध्ये राजवीर देओलची पहिली झलक पाहायला मिळाली होती. राजवीरची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये रणवीरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला 'दोनो' ही एक रोमँटिक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये लग्न राजवीर देओलचे आयुष्य कसे बदलते याची एक छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. सनी देओलच्या लाडक्या राजवीरची व्यक्तिरेखा ट्रेलरमध्ये अतिशय लाजाळू असल्याचे दाखवण्यात आले आहे. राजवीर त्याच्या जीवलग मैत्रिणीवर प्रेम करतो. पण तो तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करायला घाबरत असतो.

जेव्हा राजवीरचे मित्र त्याला लग्नासाठी आमंत्रित करतात तेव्हा तो पालोमाला भेटतो. ज्याचे सहा वर्षांचे नाते तुटलेले असते. दोघांची तुटलेली मनं एकमेकांच्या कशी जवळ येतात. इथूनच 'दोनो' चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. या चित्रपटाचा २ मिनिटे ५१ सेकंदांचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटातील गाण्यांची झलकही चाहत्यांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटामध्ये राजवीर व्यतिरिक्त पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ही देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. महत्वाचे म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश एस. बडजात्याही दिग्दर्शक म्हणून प्रवासाला सुरुवात करत आहे. अवघ्या दोन तासांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरला २ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT