Sunny Deol  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'गदर 2'च्या माध्यमातून मोठा पडद्यानंतर OTT वर धुमाकळू घालण्यासाठी Sunny Deol सज्ज, म्हणाला...

Sunny Deol OTT Debut: सनी देओल लवकरच राजकुमार संतोषी यांच्या 'लाहोर 1947' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटावर अजून काम सुरू आहे. मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर सनी देओल लवकरच ओटीटीवरही पदार्पण करणार आहे.

Priya More

Sunny Deol Movie:

बॉलिवूड (Bolywood) अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 मध्ये 'गदर 2' चित्रपटाच्या (Gadar 2 Movie) माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट सुपरहिट ठरत त्याने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने एकापाठोपाठ एक असे अनेक रोकॉर्ड मोडले. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते सनी देओलच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल लवकरच राजकुमार संतोषी यांच्या 'लाहोर 1947' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटावर अजून काम सुरू आहे. मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर सनी देओल लवकरच ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. त्याच्याकडे अनेक ओटीटी प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे आता सनी देओलो ओटीटी देखील गाजवणार असल्याचे म्हटले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सनी देओलकडे काही चित्रपट आहेत आणि त्याच्याकडे ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी देखील प्रोजक्ट आहेत. सनी देओल म्हणाला, 'हे खूपच रंजक असणार आहे. कारण मी काही चित्रपट करत आहे आणि ते मला 2025 मध्ये गोष्टी कशा असतील याचा बेंचमार्क देतील. मी करत असलेले चित्रपट हे मोठ्या पडद्यावरील चित्रपट आहेत.'

सनी देओलने पुढे सांगितले की, 'होय, मी डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी देखील काम करत आहे. मी आणखी विषय निवडत आहे आणि मला काही गोष्टी करायच्या आहेत. त्या मोठ्या पडद्यासाठी असू शकत नाहीत. कारण थिएटर मला त्यासाठी जागा देणार नाही. एक अभिनेता म्हणून मला असे वाटते की, हे चांगले आहे की ते पाहिले जाईल. जर मी ते जास्त केले तर इतर प्रेक्षकही असतील ज्यांना हे समजेल की मी ते करण्यास सक्षम आहे. जोपर्यंत मी हे करत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही. फक्त एकाच प्रकारचे काम कुणालाच करायचे नसते.'

दरम्यान, सनी देओल शेवटी 'गदर 2' चित्रपटामध्ये दिसला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा देखील मुख्य भूमिकेत होते. आता 2024 मध्ये सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीला कोण-कोणते चित्रपट घेऊन येणार आहे हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT