Shah Rukh Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Video: शाहरुख खान हुडीमध्ये चेहरा लपवून कुठे निघाला?, VIDEO होतोय व्हायरल

Shah Rukh Khan Hoodie Look: शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान स्टायलिश लूकमध्ये दिसला. हुडी घातलेल्या शाहरुखचा स्टायलिश लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Priya More

Shah Rukh Khan:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डंकी' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच खास होते. या वर्षात त्याचे ३ चित्रपट रिलीज झाले आणि तिन्हीही सुपरहिट ठरले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससह वर्ल्डवाइड जबरदस्त कलेक्शन केले. या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान नेहमीच चर्चेत राहतो. आता शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान स्टायलिश लूकमध्ये दिसला. हुडी घातलेल्या शाहरुखचा स्टायलिश लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

शाहरुख खान नेहमीच सार्वजनिक ठिकाणी जाताना स्वत:चा चेहरा लवपण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी तो हुडीचा आधार घेत असतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला होता. तेव्हा देखील त्याने असा लूक केला होता की कोणालाही त्याला ओळखता आले नाही. पण आता शाहरुख खान मुंबईत पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. स्टायलिश हुडीच्या कॅपने शाहरुख खानने चेहरा लपवला खरा पण त्याचा हा प्रयत्न फसला. त्याला पापाराझींनी आणि काही चाहत्यांनी ओळखले. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि मोबाइलमध्ये शाहरुख खानला कैद केले आहे.

नुकताच शाहरुख खान मुंबईतील एका क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी त्यांची व्यवस्थापक पूजा ददलानीही त्यांच्यासोबत होती. शाहरुख खानला Y+ सुरक्षा होती. शाहरुख खानने चेहरा लपवला पण त्याची ओळख पटली आणि चाहते त्याचे फोटो क्लिक करू लागले. गर्दी आणि कॅमेरे टाळत कसा तरी शाहरुख आपल्या कारमध्ये जाऊन बसला. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुखने ग्रे कलरची लाँग हुडी घातली आहे. हुडीच्या कॅपने त्याने आपला चेहरा पूर्णपणे लपविला असल्याचे दिसून येत आहे. चाहत्यांनी त्याला ओळखले आणि त्याचा फोटो काढण्यासाठी त्यांनी क्लिनिकबाहेर मोठी गर्दी केली. शाहरुख खानचे फोटो कोणी काढू नये यासाठी त्याच्या सुरक्षारक्षकाने काळी छत्री देखील उघडली होती. पण शाहरुखचा फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या कारच्या अवतीभोवती घेराव घातला होता. शाहरुख खानच्या या व्हिडिओवर चाहतेही जोरदार कमेंट करत आहेत. शाहरुखच्या लूकचे त्याचे चाहते कौतुक करत आहेत. आता शाहरुखच्या हुडीचा फॅशन ट्रेंड सुरू होईल, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT