Dunki Drop 1 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Drop 1 Teaser: 'किंग खान'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'डंकी'चा टीझर आऊट, शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं खास गिफ्ट

Dunki Drop 1 Teaser Released: शाहरुख खानचे चाहते डंकीच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

Priya More

Shah Rukh Khan Birthday:

बॉलिवूडचा 'किंग खान' आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. रात्रीपासून सगळीकडे शाहरुखच्या नावाचीच चर्चा सुरू आहे. शाहरुख आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख खानवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

अशामध्ये शाहरुख खानने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. डंकीचा टीझर रिलीज झाला आहे. शाहरुख खानचे चाहते डंकीच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

शाहरूख खानच्या 'पठाण', 'जवान' या चित्रपटानंतरचा डंकी हा यावर्षातला तिसरा चित्रपट आहे. पठाण आणि जवान चित्रपट सुपरहिट ठरला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरात जबरदस्त कमाई केली. त्यानंतर शाहरूख खानचे चाहते त्याच्या 'डिंकी' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या टीझरची शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आज संपली. डंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची खास झलख दाखवली आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुख पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा 'डिंकी' हा एक कॉमेडी ड्रामा आहे. 'डंकी फ्लाइट' नावाच्या बेकायदेशीर इमिग्रेशनच्या तंत्रावर ही कथा आधारित आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यांनी अभिजीत जोशी आणि कनिका ढिल्लों  यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे.

रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेल्या डंकीमध्ये शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, दिया मिर्झा आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आहेत. त्यांच्याशिवाय धर्मेंद्र, सतीश शहा, परीक्षित साहनी हेही कलाकार दिसणार आहेत.

या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि काजोल देखील कॅमिओ आणि स्पेशल अपिअरन्स असणार आहेत. डंकीचे शूटिंग मुंबई, काश्मीर, लंडन बुडापेस्ट, जेद्दाह आणि निओम येथे झाले. हा चित्रपट ध्वनिफिती प्रीतम यांनी संगीतबद्ध केला आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी परदेशात आणि 22 डिसेंबर 2023 रोजी भारतात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT