Jawan Box Office Collection Day 13 Saam tv
मनोरंजन बातम्या

Jawan Collection Day 13: गणपती बाप्पा पावला! 'जवान'ने पार केला ५०० कोटींचा आकडा, पाहा आतापर्यंत किती केलं कलेक्शन?

Jawan Box Office Collection Day 13: शाहरुख खानच्या 'जवान'ला गणपती बाप्पा पावला आहे. या चित्रपटाला ५०० कोटींपार कमाई करण्यात यश आले आहे.

Priya More

Shah Rukh Khan Jawan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. जवानची क्रेझ अद्याप संपली नाही. 'जवान' चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहे. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. जवानने ऐवढ्या दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या 'जवान'ला गणपती बाप्पा पावला आहे. या चित्रपटाला ५०० कोटींपार कमाई करण्यात यश आले आहे.

'जवान' चित्रपटाने दुसऱ्या मंगळवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने आता नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या चित्रपटाने १३ व्या दिवशी ५०० कोटींपार कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ५०७.८८ कोटींची कमाई केली आहे. एक्सपर्टचे असे म्हणणे आहे की, गणेश चतुर्थीनिमित्त असलेल्या सुट्टीचा 'जवान' चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. यापुढे देखील असलेल्या सुट्टीत देखील आणखी फायदा होण्याची शक्यता आहे.

जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॅक हॉर्स ठरला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले. एका आठवड्यातच जवानने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. तर सातव्या दिवशी या चित्रपटाने ३९१ कोटींची कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईवर थोडा परिणाम झाला. पण विकेंडला त्याने ती भर भरून काढली. शनिवारी जवानने ३२ कोटी, रविवारी ३७ कोटी, सोमवारी १६ कोटींची कमाई केली. मंगळवारी जवानने १४ कोटींची कमाई करत ५०० कोटींचा आकडा पार केला.

'जवान' चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे. या चित्रपटाने 'KGF 2' ला आधीच मागे टाकले आहे. आता जवान 'गदर 2', 'पठान' आणि 'बाहुबली 2' ला टक्कर देण्यासाठी तयार आहे. 'बाहुबली 2'ने ५१० कोटींची कमाई केली होती. आता जवान चित्रपट 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी काही अंतरच दूर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT