Shah Rukh Khan Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Dance: 'किंग खान'ने न्यू बॉर्न बेबीसोबत 'लुट पुट' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, VIDEO ने जिंकलं चाहत्यांचं मन

Shah Rukh Khan Dance With New Born Baby: सध्या दुबईमध्ये शाहरुख खान या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दुबईमधील एका कार्यक्रमातील शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो सर्वांचे मन जिंकत आहे.

Priya More

Shah Rukh Khan Dunki Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याचा आगामी 'डंकी' चित्रपटामुळे (Dunki Movie) चांगलाच चर्चेत आहे. डंकी हा शाहरुख खानचा या वर्षातला शेवटचा चित्रपट आहे. 'पठान' आणि 'जवान'च्या जबरदस्त यशानंतर शाहरुख खानचा डंकी देखील सुपरहिट ठरून चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे.

सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या दुबईमध्ये शाहरुख खान या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. दुबईमधील एका कार्यक्रमातील शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो सर्वांचे मन जिंकत आहे.

शाहरुख खानचा डंकी गुरुवारी म्हणजे २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो दुबईमध्ये आहे. याठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करताना शाहरुख खानने डंकीमधील 'लुट पुट गया' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी शाहरुख खान एकटाच नाचला नाही तर त्याने न्यू बॉर्न बेबीला सोबत घेऊन डान्स केला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खान एका कपलसोबत स्टेजवर दिसत आहे. या कपलला दोन मुलं आहेत. महिलेने तिच्या न्यू बॉर्न बेबीला घेतलं आहे. तर तिच्या नवऱ्याजवळ दुसरी मुलगी आहे. शाहरुख यान यावेळी या कपलशी गप्पा मारताना दिसत आहे. तो महिलेला म्हणतो की, 'मला तुला त्रास नाही द्यायचा कारण तुमच्याकडे लहान बाळ आहे. मी बॅक स्टेज तुम्हाला भेटेल. पण जर बाळ झोपले नसेल तर त्याच्यासोबत मी लुट पुट गयावर डान्स नक्कीच करेल.'

त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, ही महिला आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन आणि तिचा पती दुसऱ्या मुलीला घेऊन शाहरुखसोबत डान्स करत आहेत. त्यानंतर शाहरुख खान या न्यू बॉर्न बेबीला आपल्याजवळ घेतो आणि त्याच्यासोबत डान्स करू लागतो. यासोबतच तो बाळाला किस देखील करताना दिसतोय. यावेळी शाहरुख खानसोबत त्याच्या चाहत्यांनी देखील डान्स केला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने सर्वांचे मन जिंकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

SCROLL FOR NEXT