Salman Khan Makeup Artist Brutally Beaten Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला दगड आणि रॉडने बेदम मारहाण, नेमकं कारण काय?

Priya More

Salman Khan Makeup Artist:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जवळच्या व्यक्तीला रॉड आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मेकअप आर्टिस्ट सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो.

उधारीने दिलेल्या पैशांच्या वादावरून या मेकअप आर्टिस्टला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत त्याला बार मॅनेजरसह त्याच्या साथीदारांनी बारबाहेर बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेकअप आर्टीस्टने पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पालेश्वर चव्हाण असे या मेकअप आर्टिस्टचे नाव आहे. त्याने बार मॅनेजर सतीशला काही पैसे दिले होते. उधारीवर दिलेले आधीचे पैसे त्याला मिळाले. मात्र विश्वास ठेवून पालेश्वरने पुन्हा तीन लाख रुपये उधारीवर दिले. पालेश्वर पैसे परत मागण्यासाठी सतीश ज्या बारवर मॅनेजर आहे त्याठिकाणी गेला. पण सतीशने आधी त्याला दोन ते तीन तास वाट पाहायला लावली. त्यानंतर त्याने बार बंद आहे त्यामुळे नंतर ये असे सांगितले.

पण पालेश्वर तिथून निघून गेला नाही. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास सतीश आणि पालेश्वर यांच्यात बारबाहेर जोरदार वाद झाला. प्रकरण इतके वाढले की मॅनेजरने मित्रांना बोलावले. ते लोखंडी रॉड, विटा आणि दगड घेऊन तेथे पोहोचले. यानंतर या सर्वांनी पालेश्वरला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पालेश्वर गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालेश्वरच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मॅनेजर आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हाही दाखल केला. मेकअप आर्टिस्टने सतीश आपला चांगला मित्र असल्याचे पोलिसांना सांगितले. यापूर्वीही त्याने त्याला पैसे दिले होते. मात्र त्याने ते वेळेवर परत केले. पुन्हा त्याने तीन लाख रुपये मागितले. मेकअप आर्टिस्टने पैसे दिले खरे पण मॅनेजरने ते त्याला परत दिले नाही. वारंवार मागून देखील पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद होऊन हे संपूर्ण प्रकरण घडलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT