Tiger 3  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 OTT Release: 'टायगर ३' न पाहिलेल्यांसाठी सलमान खानने दिली गुड न्यूज, आता घर बसल्या OTT वर पाहायला मिळणार

Salman Khan Post On Tiger 3: 'टायगर ३' चित्रपट पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी इतकी गर्दी केली होती की सर्वच शो हाऊसफुल होते. पण सलमानच्या काही चाहत्यांना हा चित्रपट पाहता आला नाही. या अशा चाहत्यांसाठी सलमान खानने खास गिफ्ट दिलं आहे.

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर ३' या चित्रपटाने (Tiger 3 Movie) बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी इतकी गर्दी केली होती की सर्वच शो हाऊसफुल होते. पण सलमानच्या काही चाहत्यांना हा चित्रपट पाहता आला नाही. या अशा चाहत्यांसाठी सलमान खानने खास गिफ्ट दिलं आहे. सलमान खानचा टायगर ३ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज (Tiger 3 OTT Release) होणार आहे. सलमान खानने सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफच्या अ‍ॅक्शन पॅक्ड स्पाइ थ्रिलर टायगर ३ आता डिजिटल प्लॅटफॉर्म ओटीटीवर रिलीज होणार आहे. आता सलमान खानचे चाहते घरी बसून हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर पाहू शकणार आहेत. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही त्यांच्यासाठी ही खास मेजवानी असणार आहे. सलमान खानने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. टायगर 3 चे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सलमान खानने याची घोषणा केली. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लॉक्ड, लोडेड आणि रेडी.' टायगर येत आहे. 'टायगर 3' आता प्राइम व्हिडिओवर पाहा.'

या पोस्टनंतर भाईजानच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केले आहे. त्याचे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'सलमान, तू माझा आवडता अभिनेता आहेस.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'उंचीचा हा प्रवास चिरंतन राहू दे.' याव्यतिरिक्त सलमानच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटमध्ये हार्ट आणि फायर इमोजी देखील शेअर करत आहेत.

टायगर 3 च्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटाचे भारतात सर्व भाषांमध्ये 282.79 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने 450 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे. अ‍ॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार असल्यामुळे सलमानचे चाहते उत्सुक असून या ठिकाणी देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT