Riteish Deshmukh Tweet On India Vs Bharat Saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh Tweet : 'इंडिया विरुद्ध भारत'च्या वादावर रितेशनं घेतला पोल, कौल दिला वेगळाच...

India Vs Bharat Controversy: अभिनेता रितेश देशमुखने (Actor Riteish Deshmukh) इंडिया विरुद्ध भारतच्या वादावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोल घेतला आहे.

Priya More

Riteish Deshmukh Tweet On India Vs Bharat:

सध्या देशामध्ये 'इंडिया विरुद्ध भारत'वरून (India Vs Bharat) जोरदार वाद सुरु आहे. सोशल मीडियापासून (Social Media) ते सर्वसामान्यांपर्यंत याच मुद्द्यावरून चर्चा सुरु आहे. अनेकांनी भारत नाव असावे असे मत मांडले आहे तर काहींनी इंडिया नावाला पाठिंबा दिला आहे. या वादादरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उडी मारत काहींनी भारत नावाला पाठिंबा दिला. अशामध्ये आता बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी चित्रपटसृष्टीचा अभिनेता रितेश देशमुखने (Actor Riteish Deshmukh) इंडिया विरुद्ध भारतच्या वादावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोल घेतला आहे.

रितेश देशमुखने आज साडेबाराच्या सुमारास एक्स म्हणजे ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने इंडिया विरुद्ध भारतच्या वादावर 'तुम्हाला काय वाटतं?' असा प्रश्न करत पोल घेतला आहे. यामध्ये त्याने 'भारत', 'इंडिया', 'हिंदुस्थान' आणि शेवटचा 'सगळे सारखेच आहे' असे चार पर्याय दिले आहे. रितेशने दिलेल्या या पोलला अनेकांनी वोट केले आहे.

रितेशच्या या पोलला २४ तासांसाठी वोट करण्यात येणार आहे. आतापर्यंत या पोलला ३५ हजार ७०७ लोकांनी वोट केलं आहे. यापैकी भारतला २९.६ टक्के लोकांनी वोट केलं आहे. इंडियाला २३.७ टक्के लोकांनी वोट केलं आहे. हिदुस्थानला ४.२ टक्के लोकांनी वोट केलं आहे. तर सगळे सारखेच या पर्यायाला ४२.५ टक्के लोकांनी वोट केलं आहे. आता पुढच्या काही तासांमध्ये आणखी काही लोकांनी कोणत्या पर्यायाला वोट केलं आहे हे समोर येईल.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी इंडिया विरुद्ध भारतवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, 'जर भारताला भारत म्हटले जात असेल तर ती वाईट गोष्ट नाही. पूर्वी आपल्या देशाला भारत म्हटले जायचे ना. माझे नाव जॅकी आहे, काही मला जॉकी म्हणतात तर काही मला जाकी म्हणतात. लोकं माझं नाव बदलतात यामुळे मी नाहीना बदलणार. फक्त नाव बदलले. आपण बदलत नाही. तुम्ही लोकं देशाचे नाव बदलत राहता. पण हे नका विसरु की आपण भारतीय आहोत.' कंगना रनौतने देखील ट्वीट करत भारत नावाला पाठिंबा दर्शवला होता. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी 'भारत माता की जय...' असे ट्वीट केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT