Randeep And Lin Reception Party Saam Tv
मनोरंजन बातम्या

Randeep And Lin Reception Party: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने लग्नानंतर दिली जंगी रिसेप्शन पार्टी, कपलचे क्युट फोटो व्हायरल

Randeep And Lin Wedding: रणदीपने लग्नानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी (Randeep And Lin Reception Party) ठेवली होती. रणदीपच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Priya More

Randeep Hooda And Lin Laishram Wedding:

बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डाने (Randeep hooda) २९ नोव्हेंबरला गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत (lin laishram) मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. मणिपूरच्या इंफाळ शहरात मेईतेई रितीरिवाजांनुसार रणदीप आणि लिनने अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्याच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

आता रणदीपने लग्नानंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी (Randeep And Lin Reception Party) ठेवली होती. रणदीपच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी रणदीप आणि लिन दोघेही खूपच क्युट दिसत होते. रणदीपने सोशल मीडियावर रिसेप्शन पार्टीचे क्युट फोटो शेअर केले आहेत.

'मर्डर 3', 'सरबजीत', 'हायवे' आणि 'सुलतान' या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या रणदीप हुड्डाने काही दिवसांपूर्वी त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर सोमवारी त्याने मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या जंगी रिसेप्शन पार्टीमध्ये रणदीप आणि लिन यांच्या मित्र परिवारासोबत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत दोघांना शुभेच्छा दिल्या.

या रिसेप्शन पार्टीला अभिनेत्री तमन्ना भाटिया, विजय वर्मा ते उर्वशी रौतेलापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रणदीप आणि लिनचे या रिसेप्शन पार्टींचे रोमँटिक फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो इन्स्टावर शेअर करत रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'In our eternal garden of Eden' असे लिहिले आहे. रणदीप आणि लिन रिसेप्शन पार्टीत खूपच सुंदर दिसत होते. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत.

रिसेप्शन पार्टीमध्ये लिनने लाल रंगाची चमकणारी साडी घातली होती. जी तिने मॅचिंग दुपट्ट्यासह स्टाईल केली होती. केसाचा बन, डायमंड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमध्ये लिन खूपच क्युट दिसत होती. तर रणदीप त्याच्या लेडी लव्हसोबत काळ्या कोट-पँटमध्ये खूपच हँडसम दिसत होता. दरम्यान, रणदीप हुड्डा लवकरच 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT