Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: 'एवढा अहंकार चांगल नाही...', पापाराझींवर पुन्हा भडकला रणबीर कपूर; व्हिडीओ व्हायरल होताच झाला ट्रोल

Ranbir Kapoor Angry On Paparazzi: नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो पापाराझींवर संतापलेला दिसत आहे.

Priya More

Ranbir Kapoor Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'ब्रह्मास्त्र' आणि 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानंतर 'अ‍ॅनिमल'(Aminal Movie) हा त्याचा या वर्षातला शेवटचा चित्रपट आहे.

अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूर पहिल्यांदा ग्रे शेड अवतारात दिसणार आहे. पण रुपेरी पडद्याआधीच रणबीरचा अँग्री यंग मॅन अवतार सोशल मीडियावर पाहायला मिळाला. नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो पापाराझींवर संतापलेला दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले आहे.

रणबीर कपूरचा एक व्हिडिओ बुधवार संध्याकाळपासून इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, रणबीर कपूर त्याच्या कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्या दरम्यान पापाराझी रणबीरला फोटोसाठी पोझ देण्यासाठी विनंती करतात. एक कॅमेरामन त्याला हाक मारतो आणि म्हणतो 'आरके भाऊ थांबा.' पापाराझींच्या बोलण्यावर रणबीर कपूरला थोडा राग येतो आणि तो म्हणतो - काय करू भाऊ? मी काय करू? आणि मग पुढे जातो. आपल्या कारमध्ये बसून तो निघून जातो.

यावेळी पाराझींनीही रणबीरला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पण तो उत्तर न देता कारमध्ये बसून निघून गेला. रणबीर पापाराझींवर संतापला हे कोणालाच आवडले नाही. रणबीरचे हे वागणं त्याच्या चाहत्यांना देखील आवडले नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे. या व्हिडीओवरून रणबीर कपूर ट्रोल झाला आहे. रणबीरच्या वागण्यावर एका यूजरने लिहिले - 'आरकेने वाईट वागला.' तर दुसर्‍या युजरने लिहिले की, 'आरकेचे वागणे अत्यंत असभ्य आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले की, हे अजिबात चांगले नाही' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'एवढा अहंकार चांगला नाही.'

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणपबीर अ‍ॅनिमल चित्रपटामध्ये त्याचा अ‍ॅक्शन आणि ग्रे-शेड अवतार दाखवणार आहे. रणबीरसोबत या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. संदीप वांगा रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT