Ranbir Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoorने 'कभी खुशी कभी कम'सोबत केली 'Animal'ची तुलना, अभिनेता असं का म्हणाला?

Ranbir Kapoor Compares Animal Movie With Kabhi Khushi Kabhie Gham: चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. या ट्रेलरमधील रणबीरचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

Priya More

Ranbir Kapoor Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याचा बहुप्रतीक्षित 'ॲनिमल' चित्रपटामुळे (Animal Movie) चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'ॲनिमल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. या ट्रेलरमधील रणबीरचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान निर्मात्यांनी 'ॲनिमल'चा ट्रेलर मोठ्या धूमधडाक्यात रिलीज केला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने ॲनिमलची तुलना फॅमिली ड्रामा फिल्म 'कभी खुशी कभी गम'शी केली. रणबीर कपूर म्हणतो की हा चित्रपट 'कभी खुशी कभी गम' असा ॲडल्ट रेट आहे. रणबीर या मुलाखतीमध्ये नेमकं असं का म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिल्यांदाच रणबीर कपूरचा रोमान्स आणि कॉमेडी त्याच्या आगामी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार नाही. कारण 'ॲनिमल' चित्रपटात तो ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. दिल्लीतील मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने या चित्रपटाचे वर्णन अडल्ट 'कभी खुशी कभी गम' असे केले होते. रणबीर कपूर ट्रेलर रिलीजवेळी माध्यमांशी बोलताना या चित्रपटाच्या थीमकडे बोट दाखवून सीबीएफसीकडून प्रमाणपत्र मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.

रणबीर कपूरनेही या कार्यक्रमात सांगितले की, 'माझी मुलगी राहाचा जन्म तो चित्रपटाचे शूटिंग करत असताना झाला. अशा परिस्थितीत गंभीर भूमिका करून घरी जाणे मला आवडले.' रणबीर कपूर पुढे म्हणाला की, 'मी वेगळा माणूस आहे. मी माझे पात्र घरी घेऊन जात नाही. हे माझ्या कुटुंबीयांसाठी चांगले नाही. आणि जर मी घरी जाऊन असे कृत्य केले तर माझी बायको मला मारहाण करेल.'

ॲनिमल मूव्हीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीही सोशल मीडियावर चित्रपटाला ए प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती दिली होती. यासोबतच दिग्दर्शकाने सांगितले की, चित्रपटाचा रनटाइम 3 तास 21 मिनिटे 23 सेकंद असेल. आणि 16 फ्रेम्स. रणबीर कपूरसोबत, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकार 'ॲनिमल'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT