बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) बहुप्रतिक्षित 'श्री' (SRI) चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव आता 'श्रीकांत' असे ठेवले आहे. हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. राजकुमार रावशिवाय या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाचे नाव 'श्रीकांत – आ रहा है सबकी आंखे खोलने' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'सांड की आँख' फेम दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. श्रीकांत बोला हे अंध असताना देखील अमेरिकेत शिकणारे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी होते. ते एक यशस्वी व्यावसायिक बनून दाखवतात.
हा चित्रपटामध्ये प्रेक्षकांना श्रीकांत बोलाच्या रोमांचक आणि प्रेरणादायी प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यांनी अंध असूनही आपली स्वप्ने पूर्ण केली आणि बोलंट इंडस्ट्रीज नावाची कंपनी स्थापन केली. श्रीकांत जन्मापासूनच अंध होते आणि त्याचे कुटुंब प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होते. शेतकरी कुटुंबातून आले असताना देखील श्रीकांत यांनी अथक परिश्रम करत प्रसिद्ध व्यावसायिक झाले.
श्रीकांत बोला यांनी 2012 मध्ये त्यांनी रतन टाटा यांच्या निधीतून बोलंट इंडस्ट्रीज सुरू केली. ही कंपनी इको-फ्रेंडली पॅकेजिंग उत्पादने तयार करते आणि अनेक अपंग लोकांना रोजगार देते. हा चित्रपट T-Series Films आणि Choc N Cheese Films Production LLP च्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी आहेत.
अलाया एफ ही पहिल्यांदाच राजकुमार रावसोबत काम करत आहे. तिने या चित्रपटाबद्दल आणि राजकुमारसोबत काम करण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. चित्रपटाचे शूटिंग चांगले चालले असल्याचे तिने सांगितले होते. गेल्या वर्षी डिसेंबर आणि यावर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटाची टीम एकमद सुंदर आहे. राजकुमार एकदम अविश्वसनीय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.