Manoj Bajpayee  Instagram
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयी खरंच लोकसभा निवडणूक लढवणार?, चर्चेनंतर अभिनेत्याने दिली पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनंतर (Madhuri Dixit) आता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अभिनेत्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

Actor Manoj Bajpayee:

2024 या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सर्व राज्यामध्ये या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीला उभं राहण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार प्रयत्न करत आहेत.

अशामध्ये आता काही बॉलिवूड सेलिब्रिटी देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनंतर (Madhuri Dixit) आता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांनंतर मनोज वाजपेयीने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरच त्याने यासंदर्भात पोस्ट केली आहे.

मनोज वाजपेयी बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतो अशा बातम्या सोशल मीडिया आणि अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्या आहेत. तो बिहारच्या चंपारण्य मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या अफवा सध्या पसरल्या आहेत. आता निवडणूक लढवण्याच्या अफवांनंतर स्वत: मनोज वाजपेयीनेच या अफवेमागचे सत्य सांगितले आहे.

मनोज वाजपेयीने निवडणूक लढवण्याच्या बातमीची सत्यता सांगितली. त्याने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिले आहे. मनोज वाजपेयीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'ठीक आहे, मला सांगा. हे तुम्हाला कोणी सांगितले किंवा तुम्हाला काल रात्री काही स्वप्न पडले होते का? सांगा सांगा.'

दरम्यान, मनोज बाजपेयी 'द फॅमिली मॅन' नंतर त्याच्या दुसऱ्या OTT रिलीज 'किलर सूप' साठी चर्चेत आहे. त्याच्या डार्क कॉमेडी थ्रिलर वेब सिरीजचा ट्रेलर दोनच दिवसांपूर्वी रिलीज झाला. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. मनोज वाजपेयी 'किलर सूप'मध्ये ओटीटीवर प्रथमच कोंकणा सेन शर्मासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. ही वेब सिरीज 11 जानेवारी 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये पहिल्यांदाच मनोज वाजपेयी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT