Kartik Aaryan Fan Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: 9 दिवस, 1200 किमी ..., कार्तिक आर्यनचा जबरा फॅन, एका भेटीसाठी झाशी ते मुंबई सायकलवरून प्रवास

Kartik Aaryan Fan Video Viral: कार्तिकचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी थेट झाशीवरून मुंबईत आला. हा चाहता झाशीवरून कारने, बसने किंवा विमानाने आला नाही तर तो चक्क सायकल चालवत मुंबईत पोहचला. कार्तिकच्या या जबरा फॅनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Priya More

Kartik Aaryan Fan:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्तिक आर्यनचा मोठा चाहता वर्ग आहे. कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी त्यांचे चाहते मुंबईतील घराबाहेर मोठी गर्दी करत असतात. अशातच कार्तिकचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी थेट झाशीवरून मुंबईत आला. हा चाहता झाशीवरून कारने, बसने किंवा विमानाने आला नाही तर तो चक्क सायकल चालवत मुंबईत पोहचला. कार्तिकच्या या जबरा फॅनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा असणारा त्याचा चाहता थेट झाशीवरून मुंबईला आला. त्याने झाशी ते मुंबई अशा 1200 किलो मीटरचा प्रवास 9 दिवसांत पूर्ण केला होता. कार्तिकचा हा चाहता थेट सायकलवरून मुंबईत आला. हजारो किलोमीटरचा हा प्रवास त्याने सायकलने पार केला. आपल्या जबरा फॅनची त्याला भेटण्याची ही इच्छा कार्तिकने देखील पूर्ण केली. कार्तिकने घराबाहेर पडून चाहत्याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत फोटोही क्लिक केले.

कार्तिक आर्यन आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार्तिक आर्यन काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू ट्राउझर्समध्ये दिसत आहे. तर त्याच्यासोबत उभा असलेली व्यक्ती त्याचा जबरा फॅन आहे. कार्तिकचा हा चाहता त्याला भेटण्यासाठी झाशीपासून मुंबईपर्यंत सायकलने आला आहे. कार्तिकने चाहत्याची भेट घेतलीच. त्याच्याशी गप्पा मारून फोटोही काढले. कार्तिक आर्यन आणि चाहत्यांच्या गोड भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कार्तिक आर्यन शेवटी 'सत्यप्रेम की कथा' मध्ये कियारा अडवाणीसोबत रुपेरी पडद्यावर दिसला होता. कार्तिक लवकरच 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'चंदू चॅम्पियन' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटासाठी अभिनेत्याने बॉडी ट्रान्सफॉर्मेशनपासून लूकपर्यंत बरेच बदल केले होते. 'चंदू चॅम्पियन'नंतर कार्तिकच्या बकेट लिस्टमध्ये 'आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3' या चित्रपटांचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT