Emraan Hashmi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi: इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून आकडा मोजतच राहाल...

Emraan Hashmi Car Collection: इम्रान हाश्मीने नवीन वर्षात आलिशान कार घरी आणली आहे. इम्रान हाश्मी भारतातील सर्वात महागड्या कारचा मालक झाला आहे. इम्रानने इम्पोर्टेड कार खरेदी केली असून त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Emraan Hashmi Buy New Car:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' चित्रपटात (Tiger 3 Movie) विलनची भूमिका साकारणारा अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या चर्चेत आला आहे. इम्रान हाश्मीने नवीन वर्षात आलिशान कार घरी आणली आहे. इम्रान हाश्मी भारतातील सर्वात महागड्या कारचा मालक झाला आहे. इम्रानने इम्पोर्टेड कार खरेदी केली असून त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमचीही नजर कारवरून हटणार नाही.

इम्रान हाश्मीने 11 जानेवारी रोजी एक जबरदस्त 'रोल्स रॉयस घोस्ट ब्लॅक बॅज'(Rolls Royce) ही आलिशान कार खरेदी केली. पापाराझींनी इम्रान हाश्मीला मुंबईत त्याच्या नवीन रोल्स रॉयस कारसोबत कॅमेऱ्यात कैद केले. इमरान हाश्मी त्याच्या नवीन खरेदी केलेल्या आलिशान कारमधून मुंबईच्या रस्त्यावर राइडचा आनंद घेताना दिसला. यावेळी तो खूपच आनंदी दिसत होता.

इम्रान हाश्मीने जी कार खरेदी केली आहे त्याची किंमत ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. त्याने खरेदी केलेल्या कारची एक्स-शोरूम किंमत 12.25 कोटी रुपये इतकी आहे. अशापद्धतीने आता इम्रान हाश्मी भारतातील सर्वात महागड्या कारचा मालक झाला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रोल्स रॉयस कारमध्ये बसलेल्या इम्रान हाश्मीचा एक वेगळाच टशन दिसून येत आहे. तो फोनवर बोलताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर कमेंट्स करत इम्रान हाश्मीच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'खूप अभिनंदन...' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'अभिनंदन मोठं मन पाहिजे भावा ऐवढे पैसे कारसाठी खर्च करण्यासाठी...' एकीकडे इम्रानच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही नेटिझन्सने त्याला ट्रोल देखील केले आहे. 'तुझ्या कमाईचा सोर्स काय आहे?', 'टायगरचे पेमेंट आलंय वाटतंय', 'मला वाटलं होतं की याचं करिअर संपलं आता.', अशाप्रकारच्या कमेंट्स करत इम्रानला ट्रोल केले आहे.

इम्रान हाश्मी शेवटी सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने विलनची भूमिका साकारली होती. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ, रिद्धी डोग्रा, विशाल जेठवा आणि कुमुद मिश्रा हे मुख्य भूमिकेत होते. 'टायगर 3'मध्ये शाहरुख खानचीही छोटी भूमिका होती. आता इम्रान हाश्मी 'डॉन 3'मध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. डॉन 3' मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT