Actor Arjun Kapoor With Sahiba Bali Photo  AI Image
मनोरंजन बातम्या

Bollywood News : मलायका अरोरानंतर अर्जुन कपूर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात ; PHOTO होतोय व्हायरल, नेमकी आहे तरी कोण?

Bollywood Actor Arjun Kapoor And Sahiba Bali Viral Photo : अर्जुन कपूरसोबतचा साहिबा बालीचा गुरुपर्वानिमित्त शेअर केलेला फोटो व्हायरल झाला आहे. कोण आहे साहिबा बाली? जाणून घ्या

Alisha Khedekar

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अर्जुनाचा मलायका अरोरा सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर साहिबा बालीसोबतचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे दोघांच्या नात्याबद्दल नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दोघांनीही या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुरुपर्वाच्या निमित्ताने साहिबा बालीने अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत दोघेही गुरुद्वाराबाहेर सेल्फी घेताना दिसत आहेत. हा फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं. अनेकांनी दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यांच्या जोडीचीही चर्चा केली.

मात्र, अर्जुन आणि साहिबा पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत असं नाही. याआधी लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामना पाहण्यासाठी दोघेही एकत्र पोहोचले होते. त्यावेळीही त्यांच्या एकत्र दिसण्यामुळे डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

कोण आहे साहिबा बाली?

साहिबा बाली ही केवळ अभिनेत्री नसून स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि कंटेंट क्रिएटर म्हणूनही तिची ओळख आहे. २०१७ मध्ये 'डिअर माया' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लैला मजनू' या चित्रपटातही ती झळकली. याशिवाय 'अमर सिंह चमकीला', 'बार्ड ऑफ ब्लड' आणि 'तनाव' यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. अभिनयासोबतच विविध क्रीडा स्पर्धांचं सूत्रसंचालन करूनही तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साहिबाच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती यूकेला गेली. दरम्यान, अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांच्या नात्याबाबत सध्या केवळ चर्चा सुरू आहेत. दोघांनीही या अफवांना दुजोरा दिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील फोर्ट परिसरात ‘Bombay’ नामफलकावरून मनसेचा आक्षेप; दुकानाच्या पाटीवर मारली पट्टी

Paneer Roll Frankie Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चटपटीत आणि चमचमीत पनीर रोल फ्रँकी, वाचा रेसिपी

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ, १० तोळा २६,१०० रुपयांनी वाढले; १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

PM Narendra Modi: 15 डिसेंबरपूर्वी परदेश दौरे टाळा; PM मोदींनी मंत्र्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी, ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? विश्वासू नेत्याने घेतली शिंदेसेनेच्या मंत्र्याची भेट

SCROLL FOR NEXT