Khushiyaan Bator Lo Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan Movie: अजय देवगणच्या 'शैतान'मधील पहिलं गाणं रिलीज, 'खुशियां बटोर लो'ला प्रेक्षकांची पसंती

Khushiyaan Bator Lo Song: नुकताच या चित्रपाटातील 'खुशियां बटोर लो'हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या गाण्याला अवघ्या काही वेळातच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

Priya More

Ajay Devgn Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'शैतान'मुळे (Shaitaan Movie) चर्चेत आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपाटातील 'खुशियां बटोर लो'हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या गाण्याला अवघ्या काही वेळातच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

अजय देवगणच्या 'शैतान' या हॉरर चित्रपटातील 'खुशियां बटोर लो' हे पहिलं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये अजय देवगण आणि ज्योतिका आपल्या मुलांसोबत मजा-मस्ती करताना आणि हसताना दिसत आहेत. अजय देवगणने हे गाणं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कुटुंबासोबत असताना प्रत्येक क्षण मौल्यवान आणि सुंदर असतो!' अजय देवगणच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

'खुशियां बटोर लो' हे 'शैतान' चित्रपटाचे पहिले गाणे आहे. हे गाणं जुबिन नौटियाल यांनी गायले आहे. 'खुशियां बाटोर लो'चे गीत कुमार यांनी लिहिले असून बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांचा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट शैतान 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

'शैतान' चित्रपटाचा टीझर आधीच युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमाच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

SCROLL FOR NEXT