Shaitaan Movie OTT Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shaitaan OTT Release: बॉक्स ऑफिसनंतर आता OTT वर 'शैतान' घालणार धुमाकूळ, या दिवशी होणार रिलीज

Shaitaan Movie OTT Release Date: दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत 138.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'शैतान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बॉक्स ऑफिसनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

Priya More

Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), आर माधवन (R Madhvan) आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत 138.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'शैतान' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बॉक्स ऑफिसनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

शैतान चित्रपट रिलीज होऊन तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवून दिली. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहे. आता प्रेक्षक हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशामध्ये शैतान चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सकडे आहेत. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. ३ मे रोजी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

शैतान चित्रपट कृष्णदेव योग्निक यांचा सुपरहिट गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या कथेसोबत चित्रपटाचे कलाकार देखील चर्चेत राहिले. चमकदार कथा आणि स्टार कास्टच्या दमदार अभिनयामुळे शैतानने चांगली कमाई केली. या चित्रपटाने जगभरामध्ये 200 कोटींपार कमाई केली आहे.

सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. साऊथ अभिनेत्री ज्योतिकाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे.

विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला होता की, 'शैतान हा आतापर्यंतचा सर्वात भितीदायक चित्रपटांपैकी एक आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तर यानंतर अनेक भितीदायक चित्रपट येण्याचा मार्ग मोकळा होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT