Aamir Khan Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Birthday: शाळेची 6 रुपये फी भरायला नव्हते पैसे, आज आमिर खान आहे 1800 कोटीचा मालक

Aamir Khan Filmy Career: एकेकाळी शाळेची 6 रुपयांची फी भरायला पैसे नसलेला आमिर खान आज 1800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आमिर खानने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे.

Priya More

Aamir Khan Net Worth:

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) आज आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिर खानने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडच्या सुपरस्टारमध्ये आमिर खानचे नाव घेतले जाते. पण आमिर खानचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. लहानपणापासूनच आमिर खानच्या घरी गरिबी होती. त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पण या परिस्थीतीवर मात केली आणि मेहनतीच्या जोरावर त्याने नाव कमावलं. आज आमिर खान कोट्यवधीचा मालक आहे. आज आपण आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त (Aamir Khan Birthday) त्याच्या लाइफशी संबंधित न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...

बॉलिवूडमधील प्रत्येक चमकणाऱ्या स्टारची स्वतःची वेगळी कहाणी आहे. काहींचा करिअरचा प्रवास अगदी सोपा होता तर काहींनी मोठ्या कष्टाने आपलं करिअर घडवलं. काहींचे बालपण गरिबीत गेले तर काहींकडे खाण्यापिण्यासाठीही पैसे नव्हते. असाच एक अभिनेता म्हणजे आमिर खान. या अभिनेत्याच्या शाळेची फी फक्त 6 रुपये होती आणि त्याकाळी त्याच्याकडे इतके पैसेही नव्हते. भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या या आमिरचे कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते.

फिल्मी कुटुंबातला असूनही एक वेळ अशी आली होती की आमिर खानच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर वाढला होता. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत स्वत: आमिर खानने खुलासा केला होता की, त्याचे कुटुंब 8 वर्षांपासून कर्जात बुडाले आहे. त्यावेळी त्यांच्या शाळेची फी सहावीत ६ रुपये, सातवीत ७ रुपये आणि आठवीत ८ रुपये असायची. तेवढी फी द्यायला देखील त्याच्याकडे पैसे नव्हते.

आमिर आणि त्याच्या भावंडांची फी नेहमीच उशिरा जमा होत असे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापक सर्व शाळेतील मुलांसमोर त्यांची नावं मोठ्याने घेत होते. एकेकाळी शाळेची 6 रुपयांची फी भरायला पैसे नसलेला आमिर खान आज 1800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आमिर खानची एकूण संपत्ती 1862 रुपये इतकी आहे.

आमिर खानचे मुंबईतल्या पॉश एरिया असलेल्या वांद्र्यामध्ये 5 हजार स्क्वेअर फुटांचा सी-फेसिंग बंगला आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये इतकी आहे. आमिर खानकडे आलिशान कार देखील आहेत. त्याच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट कार आहे. ज्याची किंमत 6.95 ते 7.95 कोटी रुपये आहे. आमिरकडे मर्सिडीज बेंझ S600 ही कार देखील आहे. ज्याची किंमत 10.50 कोटी आहे. आमिर खानचे सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी येथे ७ कोटी रुपयांचे फार्म हाऊस देखील आहे.

आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबईत झाला. ताहिर हुसैन आणि झीनत हुसैन यांच्या घरी त्याचा जन्म झाला. बॉलिवूड त्यांच्या रक्तात आहे. कारण त्यांचे वडील चित्रपट निर्माता होते आणि त्यांचे काका नासिर हुसेन देखील निर्माता आणि दिग्दर्शक होते. आमिर खानचे खरे नाव मोहम्मद आमिर हुसैन खान होते. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्याने आपले नाव आमिर खान असे केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

Maharashtra Live News Update: जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

Soldier Death : गुढे येथील जवानाला पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण; कुटुंबीयांचा आक्रोश

Janaakrosh Aandolan: क्रीडा मंत्री कुठे? रमी मंत्री इथे!, उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल|VIDEO

Angarak Sankashti : अडचणी दूर, भाग्य उजळेल! अंगारकी संकष्टी चतुर्थी चतुर्थीला हे ३ उपाय चुकवू नका

SCROLL FOR NEXT