Ranbir Kapoor And Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

69th Filmfare Awards मध्ये रणबीर-आलियाने मारली बाजी, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीचा पुरस्कार; पाहा विनर्स लिस्ट

Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ॲनिमल' (Animal Movie) आणि विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey) '12वी फेल' (12th Fail Movie) या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स जिंकले.

Priya More

69th Filmfare Awards Winner List:

69 व्या फिल्मफेअर अवॉर्डची (69th Filmfare Awards) सध्या सगळीकडे चर्चा आहे. नुकताच गुजरातच्या गांधीनगर येथे 69 वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. दोन दिवसांचा हा अवॉर्ड सोहळा खूपच धुमधडाक्यामध्ये पार पडला. रविवारी संध्याकाळी म्हणजेच २९ जानेवारीला फिल्मफेअर अवॉर्ड्सचा मुख्य कार्यक्रम पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावली.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ॲनिमल' (Animal Movie) आणि विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey) '12वी फेल' (12th Fail Movie) या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स जिंकले. या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये या दोन चित्रपटांचीच चर्चा होती.

रणबीर कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित'12वी फेल' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह इतर अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12वी फेल'चित्रपटाला फिल्मफेअर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट कॅटेगरीमध्ये '12वी फेल' या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी 'ॲनिमल', 'जवान', 'ओह माय गॉड 2', 'पठान' आणि 'रॉकी की रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांचा सहभाग होता. पण या कॅटगरीमध्ये '12वी फेल' या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड जिंकला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच '12वी फेल'च्या विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही देण्यात आला. तर 'ॲनिमल'ला सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम आणि सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला.

फिल्मफेअर अवॉर्ड 2024 च्या विजेत्यांची लिस्ट -

- सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) प्रमुख भूमिका - रणबीर कपूर (ॲनिमल)

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) प्रमुख भूमिका - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (१२वी फेल)

- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - झोरम (देबाशिष मखीजा)

- सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - विक्रांत मेस्सी (12वी फेल)

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे)

- सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) सहाय्यक भूमिका - विकी कौशल (डंकी)

- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) सहाय्यक भूमिका - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

- सर्वोत्कृष्ट गीत- अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते- जरा हटके जरा बचके)

- सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम - ॲनिमल

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- भूपिंदर बब्बल (अर्जन व्हॅली-ॲनिमल)

- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - शिल्पा राव (बेशरम रंग - पठान)

- सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) – आदित्य रावल (फराज)

- सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) - अलिझेह अग्निहोत्री (फर्रे)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT