Akhil Mishra Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akhil Mishra Passed Away: '3 Idiots' फेम अभिनेत्याचा उंच इमारतीवरून पडून मृत्यू

'3 Idiots' Actor Death News: अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये.

Priya More

Actor Akhil Mishra Death:

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'थ्री इडियट्स'मध्ये लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अखिल मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उंच इमारतीवरून पडून अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल मिश्रा हे ५८ वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल मिश्रा हे हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होते. त्याचठिकाणी बाल्कनीमध्ये काही तरी काम करत असताना ते उंच इमारतीवरून खाली पडले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये. अखिल मिश्रा यांच्या पश्चात त्याची पत्नी सुझान बर्नर्ट आहे. जी जर्मन अभिनेत्री आहे. अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती हैदराबादमध्येच होती. 'माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेला आहे.', अशी प्रतिक्रिया सुझानने दिली.

अखिल यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अखिल यांनी 'उत्तरन', 'उडान', 'सीआयडी', 'श्रीमान श्रीमती', 'हातिम' आणि इतर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अखिल मिश्रा यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'डॉन', 'गांधी', 'माय फादर', 'शिखर', 'कमला की मौत', 'वेल डन अब्बा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अखिल मिश्रा यांनी 3 इडियट्स चित्रपटामध्ये साकारलेल्या लायब्रेरियन दुबे यांची छोटी भूमिका आजही सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, शर्मन जोशी, करीना कपूर खान, आर माधवन, बोमन इराणी हे मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT