Rajkumar Rao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajkumar Rao साठी २०२३ वर्ष ठरलं खूपच खास, १४ पुरस्कार केले आपल्या नावावर; पाहा संपूर्ण लिस्ट

Rajkumar Rao Got 14 Awards In 2023: राजकुमार रावसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरले आहे. या वर्षामध्ये राजकुमार रावने सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. सध्या सर्वस्तरावरून त्याचे कौतुक होत आहे.

Priya More

Rajkumar Rao Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार रावला (Rajkumar Rao) सध्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या सुपरस्टारमध्ये राजकुमार रावचे देखील नाव घेतले जाते. जबरदस्त टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर खडतड परिश्रम करत राजकुमार रावने बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. राजकुमार रावसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरले आहे. या वर्षामध्ये राजकुमार रावने सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

राजकुमार रावने २०२३ मध्ये अनोखा विक्रम केला आहे. या अभिनेत्याने एका वर्षात सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. राजकुमार रावने या वर्षात फेब्रुवारीपासून ते आतापर्यंत एकूण १४ पुरस्कार जिंकले आहेत. त्याने एका महिन्यामध्ये अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 'बधाई दो', 'मोनिका ओ माय डार्लिंग' आणि 'गन्स अँड गुलाब्स' चित्रपटांमधील जबरदस्त अभिनयासाठी राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून ते सर्वात स्टायलिश युथ आयकॉनपर्यंत अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

यावर्षी राजकुमार रावने विशेष प्रभावशाली तरुण भारतीय पुरस्कारही जिंकला आणि तरुणांना प्रेरित केले. ऐवढं मोठं यश आणि प्रसिद्धी असून देखील राजकुमार राव ग्राउंड स्टार्सपैकी एक आहे. २०२३ वर्षात त्याच्या पुरस्कारांची ही खास कमाई उल्लेखनीय ठरली आहे. त्याच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकुमार रावने सर्वांधिक पुरस्कार आपल्या नावावर केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. या वर्षाप्रमाणे पुढच्या वर्षात देखील राजकुमार राव अनोख्या कामांद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

राजकुमार रावला मिळालेले पुरस्कार -

- नोव्हेंबर २०२३: 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी फिल्मफेअर ओटीटी अ‍ॅवॉर्ड्समधील बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड राजकुमार रावला मिळाला.

- ऑक्टोबर २०२३: एचटी सिटी ओटीटी प्ले अवॉर्ड्स २०२३ मध्ये 'गन आणि गुलाब' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता OTT परफॉर्मर ऑफ द इअर अ‍ॅवॉर्ड राजकुमार रावला मिळाला.

- ऑक्टोबर २०२३: बॉलीवूड हंगामा ओटीटी इंडिया फेस्ट २०२३ मध्ये 'गन आणि गुलाब'साठी बेस्ट फेमस अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड त्याला मिळाला.

- जुलै २०२३: ग्राझिया मिलेनियल अ‍ॅवॉर्ड्स २०२३ मध्ये 'बधाई दो' आणि 'मोनिक ओ माय डार्लिंग'साठी परफॉर्मर ऑफ द इयरअ‍ॅवॉर्ड त्याला मिळाला.

- जून २०२३: 'टाइम्स 40 अंडर 40'मध्ये वर्षातील प्रेरणादायी परफॉर्मर अ‍ॅवॉर्ड त्याला मिळाला.

- जून २०२३: IWM डिजिटल अवॉर्ड्समध्ये 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- मे २०२३: फेमिना मामा अर्थ ब्युटीफुल इंडियन्स २०२३ मधील एक्सलेंट टॅलेंट अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- मे २०२३: यूके आशियाई फिल्म फेस्टिवल ट्रेलब्लेझर अॅक्टर ऑफ द इयर अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- एप्रिल २०२३: फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड २०२३ मध्ये प्रमुख भूमिकेसाठी त्याला बेस्ट फेमस अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- एप्रिल २०२३: GQ च्या ३५ सर्वात प्रभावशाली यंग इंडियन्स पुरस्कारांमध्ये प्रभावशाली तरुण भारतीय पुरस्कार राजकुमारला मिळाला.

- एप्रिल २०२३: हॅलो हॉल ऑफ फेम येथे मोस्ट व्हर्सटाइल टॅलेंट ऑफ द इयर पुरस्कार राजकुमारला मिळाला.

- मार्च २०२३: एचटी ओटीटी प्ले चेंजमेकर अवॉर्ड्समध्ये 'बधाई दो' आणि 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी पाथब्रेकिंग परफॉर्मर ऑफ द इयर अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- मार्च २०२३: बॉलीवूड हंगामा स्टाईल आयकॉन्समधील सर्वात स्टायलिश युथ आयकॉन अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

- फेब्रुवारी २०२३: न्यूज 18 रील अवॉर्समध्ये 'मोनिका ओ माय डार्लिंग'साठी बेस्ट अ‍ॅक्टर अ‍ॅवॉर्ड राजकुमारला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT