Demont Colony 2 Vs Stree 2 Released Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Demont Colony 2 Vs Stree 2 : 'डेमोंटे कॉलोनी'चा सिक्वेल येतोय, 'स्त्री २'ला मोठा फटका बसणार? सर्वाधिक हिट कोण ठरणार?

Demont Colony 2 Vs Stree 2 Released Date : 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाच्या अडचणी वाढल्याचं दिसतं आहे. कारण याचवेळी साऊथचा हॉरर चित्रपटही रिलीज होणार आहे, ज्याचा पहिला पार्ट ब्लॉकबस्टर ठरला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैष्णवी राऊत, साम टीव्ही, मुंबई

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना अशी भन्नाट स्टारकास्ट असलेल्या 'स्त्री २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'स्त्री २'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. केव्हा एकदाचा ऑगस्ट महिना सुरू होतोय, याची उत्सुकता 'स्त्री'च्या चाहत्यांना आहे. पण 'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाच्या अडचणी वाढल्याचं दिसतं आहे. कारण याचवेळी साऊथचा हॉरर चित्रपटही रिलीज होणार आहे, ज्याचा पहिला पार्ट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचं नाव आहे 'डेमोंटे कॉलोनी २'

'डेमोंटे कॉलोनी २' या चित्रपटाचा पहिला पार्ट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. हा एक हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात अरुलनिथी, रमेश थिलक आणि सनंत हे साऊथचे प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय ज्ञानमुथु यांनी केलं होतं. सत्यकथेवर आधारित चित्रपटाचं कथानक आहे, हा चित्रपट फक्त २ कोटींच्या बजेटमध्येच बनवण्यात आला आहे. पण या चित्रपटाने तब्बल ६५ कोटींची कमाई केली. हॉरर चित्रपटाची ही कमाई अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेणारी ठरली आणि चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.

याच चित्रपटाचा दुसरा भाग आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तारीख ठरली आहे १५ ऑगस्ट, तीच तारीख जी 'स्त्री २'ची प्रदर्शनाची तारीख आहे. 'डेमोंटे कॉलोनी २' चा ट्रेलर रिलीज करून चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे. ज्या प्रेक्षकांनी 'डेमोंटे कॉलोनी' चित्रपट पाहिला आहे, त्यांच्यासाठी 'डेमोंटे कॉलोनी २' डबल धमाका घेऊन येणार आहे. म्हणूनच 'स्त्री २'ची चिंता वाढण्याची शक्यता आहे. 'स्त्री २' चा सिक्वेल 2018 मध्ये रिलीज झाला होता. स्त्री हा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. तब्बल ६ वर्षांनी हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असला तरी 'डेमोंटे कॉलोनी 2' समोर किती चालेल, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT