मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपटांची चर्चा होत आहे. अनेक चित्रपटांतून उत्कृष्ट अभिनय करत आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. (Bollywood) (Bollywood Film) असाच एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. शाहरुख नुकत्याच काही चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या समोर आला होता. चित्रपटप्रेमींना सर्वाधिक एका गोष्टीची चाहूल लागली आहे ती म्हणजे, शाहरुख परत मुख्य भूमिकेत कधी दिसणार. या प्रश्नाचे उत्तर लवकरच सर्वांना मिळणार आहे. त्याचा बहुचर्चित पठाण चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. पठाण चित्रपटातून तो पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची ताकद रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे. (Shahrukh Khan)
शाहरुखचा सध्या अखेरचा 'झिरो' हा चित्रपट होता. त्या चित्रपटानंतर तो एकाही चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला नाही. आता पुन्हा एकदा शाहरुख 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी चाहत्यांसाठी खास पर्वणीच असते. २ नोव्हेंबरला शाहरुख प्रेक्षकांना चित्रपटाची खास भेट देण्याची शक्यता आहे. त्याचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 'पठाण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.
अद्याप चित्रपटासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये एका युजरने ट्विट केले की, 'शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे.', ''पठाण' चा टीझर २ नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे.' सोशल मीडियावरील चर्चा पाहता त्याचे चाहते 'पठाण' चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे. आता चित्रपटाचा टीझर २ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या निर्मित चित्रपट २५ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (Bollywood Actor) (Bollywood Actress) चित्रपटात प्रेक्षकांना दमदार अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.