Pathaan 6th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan 6th Day: 'पठान'ची भारतासह विदेशात यशस्वी कामगिरी, सहा दिवसात अनेक चित्रपटांना टाकले पिछाडीवर...

भारतातच नाही तर जगभरातील शाहरुख खानचे चाहते त्याच्या 'पठान' चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathan 6th Day Box Office Collection: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. देशातच नाही तर परदेशात सुद्धा या चित्रपटमुळे हाऊस फुलच्या पाट्या लागल्या आहेत. दर दिवशी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. रविवारी या चित्रपटाने ५८.५० कोटींचा गल्ला जमावाला होता. चला तर काल म्हणजे सोमवारी या चित्रपटाने काय कामगिरी केली आहे यावर नजर टाकूया.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये सहाव्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचे एकूण देशातील कलेक्शन जवळपास 295 कोटी रुपये झाले आहे. चित्रपटगृहांमध्ये सातव्या दिवसाच्या अखेरीस 'पठान' देशांतर्ग 300 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल.

बाहुबली 2: द कन्क्लूजन जेव्हा हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता तेव्हा या चित्रपटाने सोमवारी सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी 40.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर टायगर जिंदा है (36.54 कोटी), हाउसफुल 4 (34.56 कोटी), क्रिश (33.41 कोटी) आणि बजरंगी भाईजान (27.05 कोटी) या चित्रपटांचा पहिल्या सोमवारचा गाल आहे. कोरोनानंतर, KGF: चॅप्टर 2 (हिंदी) ने पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर 25 कोटींहून अधिक कमाई केली होती.

भारतातच नाही तर जगभरातील शाहरुख खानचे चाहते त्याच्या 'पठान' चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, 'पठान' चित्रपटाने परदेशी बॉक्स ऑफिसवर $25.40 दशलक्ष (रु. 207 कोटी) कमावले आहेत. या चित्रपटाने रविवारी जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला.

सोमवारी (३१ जानेवारी) दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसह शाहरुख आणि 'पठान'च्या टीमने माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना शाहरुख म्हणाला, जेव्हा त्याचे चित्रपट अयशस्वी होतात तेव्हा 'भयानक' वाटते.

'पठान' चित्रपटाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'आनंद' दिल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचे शाहरुखने आभार मानले. शाहरुख म्हणाला, 'माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी हा मोठा दिवस आहे. हा आनंद आम्ही काही काळामध्ये अनुभवला नव्हता. जेव्हा तो (सिद्धार्थ आनंद) मला पठाण 2 करायचा असे म्हणेल, तेव्हा मी तो नक्की करेन.'

बॉक्स ऑफिसवर 'पठान'च्या यशामुळे कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन-स्टार शहजादाच्या निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ढकलली आहे. आता हा चित्रपट 11 फेब्रुवारीऐवजी 17 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT