Mission Raniganj song Keemti Song Released Instagram
मनोरंजन बातम्या

Keemti Song Released: ‘मिशन राणीगंज’ मधलं परिणीती- अक्षयचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज, ‘किमती’मधल्या लव्ह केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Mission Raniganj In Keemti Song Released: ‘मिशन राणीगंज’मधील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Chetan Bodke

Mission Raniganj song Keemti Song Released

‘मिशन राणीगंज’मधील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार ‘OMG 2’ नंतर या चित्रपटाच्या माध्यमातू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर चित्रपटातील ‘किमती’ हे पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

गाण्यामधील अक्षय आणि परिणीतीच्या रोमान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटातील ‘किमती’ या गाण्यामध्ये प्रेक्षकांना परिणीती आणि अक्षयची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. गाण्यामध्ये परिणीतीने सिंपल साडी, केसांचा बन आणि त्यावर गजरा लावलेला दिसत आहे. तर अक्षयने टीशर्ट, कोट आणि फॉर्मल पँट घातलेली दिसत आहे. त्या सोबतच अभिनेत्याने पगडीही घातल्याने त्याचा लूक खूपच आकर्षक दिसतोय. गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून प्रदर्शित होताच हे गाणं काही मिनिटात व्हायरल झालंय.

‘केसरी’नंतर ‘मिशन राणीगंज’मध्ये परिणीती आणि अक्षय एकत्र दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. विशाल मिश्राने ‘कीमाती’ हे गाणं गायलं असून कौशल किशोरने हे गाणं लिहिलं आहे. गाणं प्रदर्शित होताच अवघ्या काही मिनिटांतच हे गाणं प्रेक्षकांना फारच आवडत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘केसरी’ मधल्या ‘वे माही’ सारखाच प्रतिसाद मिळणार का?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

परिणीती चोप्राने आणि खासदार राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. तिचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा दीपक किंगराणी आणि पूनम गिल यांची आहे. चित्रपटाची कथा पश्चिम बंगालमधील १९८९ मध्ये झालेल्या राणीगंज कोलफील्ड आपत्तीवर आधारित आहे. अक्षय कुमारने जसवंत सिंहचे पात्र साकारले असून परिणीतीने त्याच्या पत्नीचे पात्र साकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये 105 गावांमध्ये गारपीट

Gokul Election: 'गोकुळ'चं राजकारण तापलं, भाजप अन् महाडिक गटाला डावलणं सत्ताधाऱ्यांच्या अंगलट?

परिणिती चोप्राचा नवरा राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT