Fighter 9th Day Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Fighter Box Office Collection Day 9: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; एका आठवड्यात १५० कोटी पार

Fighter Box Office Collection: हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या 'फायटर' चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Chetan Bodke

Fighter 9th Day Box Office Collection

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)चा 'फायटर' चित्रपट (Fighter Movie) २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने एका आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Bollywood)

'फायटर' चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी अर्थात २५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने एका आठवड्यात १४६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने नवव्या दिवशी ५.३५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतामध्ये आतापर्यंत एकूण १५२ कोटींची कमाई केली असून जगभरामध्ये २५० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. (Bollywood Film)

चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांकडून आणि कलाकारांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना व्हिज्युअल इफेक्ट्स, कम्प्यूटर ग्राफिक्स आणि दमदार ॲक्शन याचे सर्व मिश्रण प्रेक्षकांना चित्रपटामध्ये आहे. हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवले आहे. वायू सेनेने सादर केलेले हवाई प्रयोग सर्वाधिक पाहाण्यासारखे ठरले आहे. एकंदरीच चित्रपटाचे कथानक फारच उत्तम असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Bollywood News)

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अर्थात २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT