Drishyam 2  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 2: अजय देवगणच्या ऑन स्क्रीन लेकीने केले वजन कमी, या डाएटने घटवले १७ किलो वजन

चित्रपटातील महत्वपूर्ण पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अनुचे. ही चित्रपटात अजयच्या मुलीच्या भूमिकेत आहे. अनुचे पात्र मराठमोळी अभिनेत्री मृणाल जाधव हिने केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Drishyam 2: 'दृश्यम २' चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे, या चित्रपटासोबतच त्यातील पात्रांची ही चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे. चित्रपटातील महत्वपूर्ण पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अनुचे. ही चित्रपटात अजयच्या मुलीच्या भूमिकेत आहे. अनुचे पात्र मराठमोळी अभिनेत्री मृणाल जाधव हिने केले आहे.

मृणालने मराठी चित्रपटासह बॉलिवूडमध्ये काम केले आहे. काही प्रसिद्ध मराठी चित्रपटातही तिने भूमिका साकारली आहे. तिने पहिल्यांदा मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

तिने नुकतेच चित्रपटानिमित्त एका हिंदी संकेतस्थळाला मुलाखत दिली. त्यात ती म्हणते, "मी शाळेत असताना मला आणि माझ्या वर्गमित्रांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या की, जेव्हा तुम्ही सर्वजण शाळेच्या गणवेशात असाल त्यावेळी माझ्यासोबत कोणीही फोटो काढायचा नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले होते.

मृणाल चित्रपटाविषयी सांगते की, जेव्हा मी 11वीत शिकत होती त्यावेळी तिला 'दृश्यम 2'चित्रपटानिमित्त विचारण्यात आले होते. मृणालने लयभारी (2014), तू हि रे (2015), अंड्या चा फंडा (2017) आणि भयभीत (2020) या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे."

चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तिचे वजन 62 किलो होते, पण तिला वजन कमी करण्यास सांगितले होते. तिने बऱ्याच गोष्टी वर्ज करत तिचे वजन 17 किलोने 45 किलोपर्यंत कमी केले. यासाठी ती नेहमी डाएटमध्ये फळांचाच वापर करत होती. पहिले तीन महिने डाएट फॉलो करत वजन कमी केले.

सध्या मृणाल १२वी च्या परिक्षेची तयारी करत आहे, पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ती परिक्षा देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, मशीन आणि औषधं जप्त

Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

Accident: बॅरियरला धडकत कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली; शबरीमालाला जाणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT