Article 370 Film
Article 370 Film Twitter
मनोरंजन बातम्या

Article 370: 'आर्टिकल ३७०' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री यामी गौतम नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. यामी गौतमचा आर्टिकल ३७० हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. परंतु ज्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला नाही, त्या प्रेक्षकांना आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Article 370 Release On Netflix)

जम्मू काश्मीरमधील 'आर्टिकल ३७०' कलम रद्द करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. याच घटनेवर आधारित आर्टिकल ३७० (Article 370) चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटात यामी गौतम प्रमुख भूमिकेत काम करत आहे. तर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'आर्टिकल ३७०' चित्रपट १९ एप्रिलला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नाही. त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे. 'आर्टिकल ३७०' चित्रपटाला प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिले होते. अवघ्या २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१ कोटींचा कमाई केली आहे. या चित्रपटात अरुण गोविल, यामी गौतम, वैभव तत्ववादी, संकद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, सुमित कौल अशी स्टारकास्ट होती. या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन आदित्य धर याने केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

Special Report : Amol Kolhe | हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार? संसदेत कोल्हे जाणार की आढळराव?

Special Report : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Shirur Loksabha: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद; २४ तासांनंतर पुन्हा सुरू

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये वीज पडून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT