Gadar 2- OMG 2 1St Day Box Office Collection: ११ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी दोन दमदार सेलिब्रिटींचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
अक्षय कुमारचा ‘OMG 2’ तर सनी देओल आणि अमिशा पटेल अभिनित ‘गदर २’ ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. दोन्हीही दमदार सेलिब्रिटींचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले होते.
चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांची पाऊलं थिएटरकडे वळाली आहेत. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून कोणत्या चित्रपटाने किती कमाई केली, चला तर जाणून घेऊया...
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४० कोटींची दमदार कमाई केली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सनी देओलसह अमिशा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘गदर २’मध्ये तारा सिंह आणि सकिनाची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या फारच पसंदीस उतरली आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्याच धमाकेदार कमाई केल्यामुळे चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
तर एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा खास प्रतिसाद मिळाला नाही. ‘OMG 2’मध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त जेमतेम १० कोटींचीच कमाई केली आहे. ‘OMG 2’ या चित्रपटाच्या कथानकाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दोन्ही चित्रपट येत्या पहिल्या विकेंडला बॉक्स ऑफिसवर आणखी कमाई करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वात पहिले ‘गदर’ बद्दल बोलायचे तर, प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा पहिला भाग २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल २२ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. ‘गदर २’ ची स्टोरी तारा सिंह आणि मुलगा चरणजीत सिंह भोवती फिरत आहे. तर ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘OMG 2’ ची देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई होत आहे. अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचं कथानक शिवभक्त कांती शरण मुदगल अर्थात पंकज त्रिपाठीभोवती फिरत आहे.
दरम्यान ‘OMG 2’बद्दल बोलायचे तर, हा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून २० कट सुचवण्यात आले होते. चित्रपटाची जेव्हा घोषणा करण्यात आली, त्यावेळी तो ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण नंतर निर्मात्यांनी अचानक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.