Salman Khan's Special Post For Sunny Deol: ‘ढाई किलोचा हात अन् चाळीस कोटींची कमाई...’ भाईजानने केली सनी देओलसाठी खास पोस्ट; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Salman Khan Shared Poster Of Gadar 2 Featuring Sunny Deol: सध्या सर्वत्र चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, अनेक सेलिब्रिटींनी ही सनी देओलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Salman Khan Shared Poster Of Gadar 2 Featuring Sunny Deol
Salman Khan Shared Poster Of Gadar 2 Featuring Sunny DeolInstagram
Published On

Salman Khan Gives A Shoutout To Sunny Deol: अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाडके कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५ कोटींची कमाई केली आहे. ससध्या सर्वत्र चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, अनेक सेलिब्रिटींनी ही सनी देओलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सलमान खानने सनी देओलच्या चित्रपटासाठी खास पोस्ट केली आहे.

Salman Khan Shared Poster Of Gadar 2 Featuring Sunny Deol
Kushal Badrike Share Post: स्वतःचा प्रवासखर्च, जेवण सुद्धा घरचं... कुशलची अशी अवस्था का झाली? हे आहे कारण

चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी इतकी जबरदस्त कमाई केली आहे, हे पाहून अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या निर्मात्यांसह, दिग्दर्शकांवर आणि कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकताच सनी देओल, अमिशा पटेल आणि उत्कर्ष शर्मा अभिनित चित्रपटाचे बॉलिवूडच्या भाईजानने चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याने खास पोस्ट करत कलाकारांचे कौतुक केले आहे.

सलमान खान पोस्ट करत म्हणतो, “ढाई किलोचा हात चाळीस कोटींच्या कमाईसोबतची आहे. सनी पाजी तुम्ही धडाकेबाज कमाई केली आहे. ‘गदर २’च्या टीमचे अभिनंदन.” अद्याप सलमानच्या पोस्टवर सनी देओलने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेमका सनी देओलच्या या ट्वीटवर सनी देओल उत्तर देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Salman Khan Shared Poster Of Gadar 2 Featuring Sunny Deol
Upcoming Web Series : कौटुंबिक प्रेमाची थरारक कथा; 'आरंभ' नवी वेबसीरीज प्रदर्शित

सलमानच्या ह्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सलमानच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ११ ऑगस्टच्या संध्याकाळच्या शो दरम्यान थिएटरमध्ये प्रेक्षकांची एकच गर्दी पाहायला मिळाली, चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहता चित्रपट दुसऱ्या दिवशी ५० कोटींच्या आसपास कमाई करू शकतो. एकूणच हा पहिल्या विकेंडमध्येच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com