Adipurush Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush teaser: प्रभासचा 'आदिपुरुष' करणार 'अधर्माचा नायनाट'; कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले...

चित्रपटात प्रभास 'रामा'ची तर सैफ अली खान 'रावणा'ची भूमिका साकारणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगत होती. येत्या १२ जानेवारी रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मुख्य भूमिकेत (Bollywood) दाक्षिणात्य सुपरस्टार तसेच बाहूबली उर्फ प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), कृती सेनन (Kriti Senon) दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. रविवारी राम नगरी म्हणून सर्वश्रृत असलेल्या अयोध्येत सिनेमाचा भव्य दिव्य टिझर प्रदर्शित करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटातून प्रेक्षकांना रामायण दाखवण्याचा विडा उचलला. 'आदिपुरुष' सिनेमाची पहिलीच झलक चाहत्यांच्या मनात घर करुन गेली आहे. सिनेमात प्रभासने रामाची तर सैफ अलीने रावणाची भूमिका साकारली आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे. प्रभासचा आवाजासोबतच व्हिएफएक्सने टिझरची सुरुवात झाली आहे.

प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये एकीकडे पाण्यात तपश्चर्या करत असून दुसरीकडे हातात धनुष्यबाण वापरत शत्रूंवर हल्ला करताना दिसत आहे. सोबतच टिझरमध्ये सैफ अली खान हिमालयातील एका प्रदेशात दिसत असून त्याला रावाणासारखे दहा तोंड टिझरमध्ये दिसत आहेत. टिझरमध्ये क्रिती सेननची छोटीशी झलक दिसत आहे. प्रभासच्या अभिनयासोबतच शरद केळकरचाही संवाद ऐकू येत आहे.

चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी निर्मीती केली आहे. चित्रपटात मराठी कलाकारही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. काही मिनिटाच्या टिझरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. चित्रपटात भव्यदिव्य व्हिएफएक्सची जादू दिसत असून चित्रपट बिगबजेट आहे. चित्रपट पुढच्या वर्षी १२ जानेवारीला जगभरात प्रदर्शिच होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! या बँकेचा परवाना केला रद्द, कारण काय?

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

SCROLL FOR NEXT