Mirzapur 3 Gandi Bimari Rap Song Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mirzapur 3 : "शुरू मजबूरी में किए थे, पर अब मजा आ रहा है"; 'मिर्झापूर ३'च्या रिलीजच्या आधीच चाहत्यांना मिळालं मोठं सरप्राइज

Mirzapur 3 Gandi Bimari Rap Released : पोस्टर, प्रोमो आणि ट्रेलरनंतर आता सीरीजमधील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे. रॅप साँग नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

Chetan Bodke

गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक 'मिर्झापूर ३'ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही सीरीज येत्या ५ जुलैला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ' वर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित एकत्र पाहायला मिळणार आहे. पोस्टर, प्रोमो आणि ट्रेलरनंतर आता सीरीजमधील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे. रॅप साँग नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.

'गंदी बिमारी' असं या रॅपचं नाव असून हे नवं रॅप गुड्डू पंडितवर चित्रित करण्यात आलेलं आहे. या रॅपची सुरुवात "शुरू मजबूरी में किए थे, पर अब मजा आ रहा है…" अशा वाक्याने होते. या रॅपमध्ये गुड्डू पंडितचा हा डायलॉग चाहत्यांना ऐकायला मिळत आहे. या रॅपमध्ये कालीन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू भैया (अली फजल), शरद शुक्ला (अंजुम शर्मा) सह सीरीजमधील अनेक कलाकार रॅपमध्ये दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच या सीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला होता. ट्रेलरमधील अनेक शॉर्ट्स आणि रॅपमधील काही व्हिडिओ एकत्रित करून हे नवं रॅप साँग क्रिएट केलेलं आहे. या रॅपमध्ये अनेक सीन्स ट्रेलरमधीलच आहे. हे रॅप सुप्रसिद्ध रॅपर रागाने गायले आहे आणि हे रॅपही त्याने स्वत: लिहिलेलं आहे. व्हिडिओमध्ये रॅप करताना रागाची झलकही पाहायला मिळत आहे. सध्या त्याच्या ह्या नव्या रॅपची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

'मिर्झापूर'चा तिसरा सीझन चार वर्षांनी रिलीज होत आहे. 'मिर्झापूर'चा पहिला सीझन २०१८ मध्ये तर 'मिर्झापूर' चा दुसरा सीझन २०२० मध्ये आला होता. प्रेक्षकांकडून या सीरीजचे जोरदार कौतुक केले जात असून प्रेक्षक 'मिर्झापूर ३'साठी प्रचंड उत्सुक आहेत. निर्मात्यांनी 'मिर्झापूर ३' साठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'मिर्झापूर ३'साठी निर्मात्यांनी १०० कोटी रुपये खर्च केले आहे. तर 'मिर्झापूर २' साठी ६० कोटी तर 'मिर्झापूर' साठी १२ कोटी खर्च केले होते.

'मिर्झापूर ३' सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठीसह अली फजल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका डुगल, विजय वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'मिर्झापूर ३'ची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. ही सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ५ जुलै २०२४ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT