Pankaj Tripathi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Boycott Trend: बायकॉटच्या ट्रेंडमुळं बॉक्स ऑफिसवर सिनेमांच्या कमाईत घसरण, पंकज त्रिपाठीने दिला मोठा सल्ला

बॉलिवूडला बॉयकॉट ट्रेंडने चांगलेच घेरले आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांना साधा निर्मितीचा खर्चही वसूल करता आला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वैश्विक कोरोना महामारीनंतर (Covid19) चित्रपटसृष्टीबरीच (Filmindustry) डबघाईला आली होती. परंतु आता हळूहळू चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी त्यातून सावरत आहे. त्यातच बॉलिवूडला बॉयकॉट ट्रेंडने (Bollywood Boycott) चांगलेच घेरले आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांना साधा निर्मितीचा खर्चही वसूल करता आला नाही. याचाच फटका अमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा', रणबीरच्या 'शमशेरा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटांना बसला आहे. हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाली दाखवू शकले नाहीत.

यानंतर बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन काही तरी तोडगा काढावा असे अनेकांचे मत आहे. नुकतेच शिवसेना राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. आता या बायकॉट ट्रेंडवर अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनीही मोठे विधान केले.

पंकज त्रिपाठी यांचे बायकॉटच्या ट्रेंडवर मोठे विधान…

अभिनेता पंकज त्रिपाठी बायकॉट बॉलिवूडच्या ट्रेंडबद्दल म्हणाला, 'या ट्रेंडचा परिणाम थेट चित्रपट व्यवसायावर होत आहे. एखादा चित्रपट चालत नाही म्हणजे त्याला बायकॉट केले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर ते चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत'. आता तरी मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे पंकज त्रिपाठी यांचे असे मत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बायकॉटच्या ट्रेंडने चांगलाच धुमाकुळ घातलाय. यामुळे बॉलिवूडच्या चित्रपटांना फटका बसत असल्याचा आरोप बॉलिवूडमधून केला जात आहे. अनेकांनी तर बायकॉटच्या ट्रेंडविरोधात लढा देण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. बायकॉटवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी भाष्य देखील केले. मात्र, आता पंकज त्रिपाठी यांनी केलेल्या भाष्यावर बॉलिवूडमधून नेमक्या काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT