Bollywood Halloween 2025 
मनोरंजन बातम्या

Halloween 2025: दीपिका झाली 'लेडी सिंघम', रणवीर सिंग स्पायडरमॅन...; बॉलिवूडच्या हॅलोविन पार्टीमध्ये या सेलिब्रिटींचा जलवा

Bollywood Halloween 2025: या वर्षीची बॉलीवूड हॅलोविन पार्टी खूपच शानदार होती. ओरीच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटींचे थक्क करणारे लूक दिसून आले.

Shruti Vilas Kadam

Bollywood Halloween 2025: यावर्षी लोक मोठ्या उत्साहाने हॅलोविन साजरा करत आहेत. सोशल मीडियावर हॅलोविनचा चर्चेत आहे. मग बॉलिवूड कसे मागे राहू शकते? यावेळी, बॉलिवूड स्टार्सने देखील हॅलोविन पार्टी मोठ्या उत्साहात साजरा केली . या प्रसंगी बी-टाउन स्टार्सनी त्यांच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. हे फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक स्टारचा एक अनोखा लूक पहायला मिळत आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रामणी, ज्याला ओरी म्हणून ओळखले जाते, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हॅलोविन पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बी-टाउन स्टार्सची झलक दिसते. पण, पार्टीचे स्थान कळले नाही. काही स्टार्सनी हॅलोविन थीमनुसार कपडे घातले तर काहींनी चित्रपटातील पात्रांचा लूक केला.

हॅलोविन पार्टी

पार्टीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये, दीपिका लेडी सिंघमच्या वेशात काळा चष्मा घातलेली दिसली. तर, रणवीर सिंग पूर्णपणे स्पायडरमॅनच्या वेशात होता. आलिया भट्टनेही टॉम्ब रेडरमधील लारा क्रॉफ्टच्या वेशात पार्टीला हजेरी लावली.

आणखी कोण उपस्थित होते?

चित्रपट निर्माता करण जोहर यांनीही आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय मालिकेतील, ब्रिजरटनमधील अँथनी ब्रिजरटनचा लूक केला. जान्हवी कपूर, खुशी कपूर, आर्यन खान, दिशा पटानी आणि अर्जुन कपूर यांच्यासह इतर प्रमुख बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने पार्टीत लूक केला. विशेष म्हणजे या पार्टीत अंबानी कुटुंब देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts : 'सीक्रेट सांता'मध्ये काय गिफ्ट द्या? वाचा '10' युनिक गिफ्ट आयडिया, मैत्रिणी होतील खुश

पुणेकरांचा काही नेम नाही! पाईपलाईन फुटली कार धुतली|VIDEO

Maharashtra Politics: सांगलीनंतर पुण्यात अजित पवारांचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सावकाराच्या कर्जापायी किडनी विक्री प्रकरणात कठोर कार्यवाही होणार - चंद्रशेखर बावनकुळे

National Herald Case : सोनिया-राहुल गांधींना दिलासा; सत्याचा विजय झाल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT