Vaastav Marathi Remake : " 'वास्तव'चा मराठी रिमेक आला तर कोणत्या कलाकारांना घेणार ?"; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली हिंट
Vaastav Marathi Remake Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vaastav Marathi Remake : " 'वास्तव'चा मराठी रिमेक आला तर कोणत्या कलाकारांना घेणार ?"; दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी दिली हिंट

Chetan Bodke

१९९९ मध्ये रिलीज झालेल्या 'वास्तव: द रिॲलिटी' या चित्रपटाची आजही प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसते. हा चित्रपट रिलीज होऊन आज २४ ते २५ वर्षे झालेली आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. 'वास्तव'चा मराठीमध्ये रिमेक जर आला तर कोणत्या मराठी सेलिब्रिटीला पाहायला आवडेल ? असा प्रश्न दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एका इव्हेंटमध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वत: दिलेलं आहे.

महेश मांजरेकर मुलाखतीत म्हणाले की, "मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चांगले कलाकार आहेत. जर मला त्या प्रश्नाचं उत्तर पटकन विचारलं तर, सध्या तरी माझ्या डोक्यात सिद्धार्थ जाधवचंच नाव आहे. इंडस्ट्रीमधील सगळेच कलाकार फार उत्तम आहे. पण तो फक्त कॉमेडीच करत नाही बसत. जेव्हा त्याची निवड मी 'लालबाग- परळ' सारख्या चित्रपटामध्ये केली होती. तेव्हा मला अनेकजणं म्हणालेले की, सिद्धूला घेणं म्हणजे रिस्क आहे. त्या पात्रासाठी पण तो इंटेन्स रोल चांगला निभावेल ह्याची मला खात्री होती. कारण तो एक बहुआयामी नट आहे."

'वास्तव' हा चित्रपट थिएटरमध्ये ऑक्टोबर १९९९ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, संजय दत्त, नम्रता शिरोडकर, संजय नार्वेकरसह मोहनीश बहल, परेश रावल, रीमा लागू आणि शिवाजी साटम होते. अद्याप या चित्रपटाचा मराठी व्हर्जन येणार की नाही ?, याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Health: मधुमेहींनो, आहारात हे ५ पदार्थ खा, साखर नियंत्रणात राहिल

Atal Seva Kendra Bharti 2024: 12 वी झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी,अर्ज करण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Live News Updates : मागासवर्गीय समाजांची मते वळवण्यासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरु

Natural Hair Dye : केस पांढरे झाल्याने टेन्शन आलंय? मग लोखंडी कढईत घरीच बनवा गावरान हेअर डाय

SCROLL FOR NEXT