The Kerala Story Keral High Court Decision Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ला वादाची किनार, उच्च न्यायालायाने केले महत्वपूर्ण भाष्य

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

Chetan Bodke

The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून बऱ्याच प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. हा चित्रपट 5 मे पासून अर्थात आजापासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नसल्याचेही न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देण्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता. या प्रकरणी निर्णय सुनावताना न्यायालयाने स्पष्ट केले की, इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरोधात आक्षेपार्ह असं काहीही नाही. तसेच इराक आणि सीरियाचे सर्वाधिक दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात मुस्लिम धर्मावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. यात 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया'ची (ISIS) गोष्ट सांगण्यात आली आहे.

याशिवाय न्यायालयाने असेही म्हटले आहे की, अनेक चित्रपटांमध्ये हिंदू संन्यासींना तस्कर आणि बलात्कारी म्हणून दाखवण्यात आले होते. परंतु कोणताही विरोध झाला नाही. असे अनेक हिंदी आणि मल्याळम चित्रपट आहेत.

दरम्यान, द केरळ स्टोरी आजच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयाला आश्वासन दिले आहे की, 'केरळमधील ३२,००० हून अधिक महिला आयएसआयएसमध्ये सामील झाल्या' असा दावा करणारा वादग्रस्त टीझर सोशल मीडियावरून काढून टाकला जाईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT