The Kerala Story Day 9 Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

The Kerala Story 9th Day Collection: सतत विरोध होऊनही चित्रपट १०० कोटी पार; नवव्या दिवशी केली बंपर कमाई..

सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ ने १० दिवसांच्या आतच १०० कोटींची कमाई केली आहे. ‘द केरला स्टोरी’ने ९व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवलाय चला जाणून घेऊया.

Chetan Bodke

The Kerala Story Day 9 Collection: अदा शर्मा स्टारर ‘द केरला स्टोरी’ची सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई सुरू आहे. ९व्या दिवशी अर्थात शनिवारी ‘द केरला स्टोरी’ने 100 कोटींच्या क्लबमध्ये एक मोठा विक्रम प्रस्थापित केला. कमी बजेट असलेल्या या चित्रपटाबद्दल कितीही वाद झाला तरी कमाईच्या बाबतीत चित्रपट सुसाट आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ ने १० दिवसांच्या आतच १०० कोटींची कमाई केली आहे. ‘द केरला स्टोरी’ने ९व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवलाय चला जाणून घेऊया.

भारतीय चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या माहितीप्रमाणे, चित्रपटाने शुक्रवारी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली होती, आता ९व्या दिवशी चित्रपटाने जवळपास १९ कोटींची कमाई केली आहे. अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने ९ दिवसांत एकूण १०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

गेल्या शुक्रवारी विद्युत जामवाल स्टारर IB 71, साउथ स्टार बेल्लमकोंडा श्रीनिवासनचा ‘छत्रपती’ तर शर्मन जोशीचा ‘म्युझिक स्कूल’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण ‘द केरला स्टोरी’च्या झंझावातात हे तिन्ही चित्रपट फिके पडले. प्रेक्षक आजही थिएटरमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठीच तुफान गर्दी करत आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ‘द केरला स्टोरी’च्या कमाईत ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.

‘द केरला स्टोरी’वरून इतका सुरू आहे की, त्यावरून देशात बऱ्याच प्रमाणात राजकारणही सुरू होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी या चित्रपटावर बंदी घातली होती. त्याच वेळी, प्रेक्षकांच्या कमतरतेचा दावा करत, तामिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये अनेक शो बंद करण्यात आले आहेत. पण तरीही ‘द केरला स्टोरी’च्या कमाईवर परिणाम झाला नाही.

विपुल शाहचा ‘द केरला स्टोरी’ ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता येत्या आठवड्यात तो १५० कोटींचा आकडा गाठेल यात शंका नाही. ‘द केरला स्टोरी’ प्रमाणेच, गेल्या वर्षी अनुपम खेर यांचा ‘द कश्मीर फाइल्स’नेही बॉक्स ऑफिसवर धमाल कामगिरी केली, चित्रपटाने संपुर्ण बॉक्स ऑफिसवर २४६ कोटींची कमाई केली आहे. हा आकडा गाठण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ला फारच तारेवरची कसरत करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT