Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser: गली बॉयनंतर रणवीर- आलिया पुन्हा एकत्र, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser Shared: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर नुकताच प्रदर्शित झालेला आहे.

Chetan Bodke

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser Shared On Social Media: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चा टीझर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या टीझरमध्ये आलिया आणि रणवीरची जबरदस्त लव्हकेमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अवघ्या काही सेकंदाचा हा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीझरमध्ये रॉकी आणि राणीची प्रेमकथादाखवण्यात आली आहे. रॉकी म्हणजे रणवीर तर राणी म्हणजे आलिया आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात व्याकूळ झालेले दिसत असून त्यांची प्रेमकहाणी दोघांना कुठपर्यंत नेणार हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल, चित्रपट येत्या २८ जुलैला थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये रणवीर- आलियाने स्पेशल आऊटफिट्स परिधान केले असून दोघांच्याही लूकची तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा अलिशान सेट पाहून अनेक प्रेक्षकांना चित्रपटाची कथा दमदार असेल अशी सर्वांनीच इच्छा व्यक्त केली. एक प्रकारे हा करण जोहरच्या सर्व रोमँटिक चित्रपटांचा संग्रह असल्यासारखा दिसतो. पण एकूणच टीझर खूपच दमदार आहे.

निर्मात्यांनी कालच चित्रपटाचा एक नवा पोस्टर प्रदर्शित केला होता, त्यावर निर्मात्यांनी टीझर रिलीजची माहिती दिली होताी. आलिया आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, रोनित रॉय, अर्जुन बिजलानी, क्षिती जोग, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT