Rocky Aur Raani Ki Prem Kahani New Poster Instagram
मनोरंजन बातम्या

आलिया-रणवीर थिएटर गाजवणार; Rocky Aur Raani Ki Prem Kahani चं पोस्टर लाँच,टीझर प्रदर्शनाची तारीखही ठरली

Rocky Aur Raani Ki Prem Kahani New Poster: रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा नवा पोस्टर प्रदर्शित झाला असून टीझर प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली.

Chetan Bodke

Rocky Aur Raani Ki Prem Kahani Teaser Release Date Declared: बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सर्वांनाच चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली. आज पुन्हा एकदा या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोबतच आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे, चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा नवा पोस्टर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

करणने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, आलिया भट्टने लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तर रणवीर सिंगने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये त्याचा लूक फारच डॅशिंग दिसत आहे. 

पोस्टरच्या खालच्या भागात, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर उद्या म्हणजेच २० जून ला प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहिले की, "लवकरच प्रेमाच्या दिवसांना सुरूवात होणार आहे. कृपया लक्षात असूद्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. चित्रपट येत्या २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय.”

करणच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंगमधील काही सीन्स दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी आलिया- रणवीरच्या रोमँटिक गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. चित्रपटाची शूटिंग गेल्या वर्षीच झाली असून नोव्हेंबर २०२२ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT