Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: 'फिफा' विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शाहरुखचा जलवा; 'पठाण' चित्रपटाचे करणार दणक्यात प्रमोशन?

शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Chetan Bodke

Shahrukh Khan: शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळेच शाहरुखच्या चाहत्यांना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले ज्यामुळे शाहरुख खानला जोरदार ट्रोल केले जात असतानाच शाहरुख खान या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनची तयारी करत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या त्याच्या पठाणचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या यशासाठी काही दिवसांपूर्वीच शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते, ज्याची मीडिया जगतात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र सध्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

यामध्ये शाहरुख खान त्याच्या 'पठाण' चित्रपटाचे फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रमोशन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बातमीनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेकांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अद्याप या बातमीवर चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. फिफा विश्वचषक २०२२ चा थरार नोव्हेंबरपासून सुरू झाला असून अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी रंगणार आहे.

दरम्यान, सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या 'पठाण' चित्रपटात शाहरु खानसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.त्याचबरोबर सलमान खानचीही चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT