Pathaan Movie Poster  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan: शाहरुख- दीपिकाच्या 'पठान' ला सुगीचे येणार दिवस, पण केआरकेच्या ट्वीटनं निर्मात्यांचं वाढलं टेंशन....

एकीकडे चित्रपटाला ट्रोल केले जात आहेत तर दुसरीकडे चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Pathaan: शाहरुख- दीपिका मुख्य भूमिकेत असलेला 'पठान' चित्रपटात सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. चित्रपटासह गाण्यावरही नेटकऱ्यांनी बंदी घातली होती. दीपिकाने बेशरम रंग या गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन तिला प्रचंड ट्रोल केले होते.

एकीकडे चित्रपटाला ट्रोल केले जात आहेत तर दुसरीकडे चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटासाठी परदेशात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

नुकतेच केआरके म्हणजेच कमाल राशिद खानने ट्वीट करत चित्रपट फ्लॉप होण्याचे तीन कारणं सांगितले. ट्विटमध्ये कमाल खान म्हणतो, “जर शाहरुखला वाटत असेल की माझ्या रिव्ह्यूमुळे त्याचा चित्रपट पठाण फ्लॉप होईल तर तो चुकीचा विचार करत आहे.

त्याचा चित्रपट तीन कारणांमुळे फ्लॉप होईल. १)चुकीचे नाव, २) सारखीच स्टोरी आणि अॅक्शन आणि ३) लोकांचा बहिष्कार. त्यामुळे जर तो मला चित्रपटाचा रिव्ह्यू करू नकोस असं सांगितले, तर मी करणार नाही,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलंय.

अद्याप चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला नसला तरीही चित्रपटावर एका बाजुने सडकून टिका केली जात आहे, तर दुसऱ्या बाजुला परदेशात चाहते चित्रपटाची प्रि-बुकिंग करीत आहेत. सध्या तरी चित्रपटाचं जर्मनीमध्ये प्री-बुकिंग सुरु झाले आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठान’ हा निर्माता आदित्य चोप्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सोबतच जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT